आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Business
  • Interest Rates On Savings And The Reduction Of Investment In Various Investment Options

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बचत आणि गुंतवणूक व्याजदरात कपात झाल्यास गुंतवणुकीचे विविध पर्याय असे...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोटाबंदीमुळे बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे आले आहेत. त्यामुळे व्याजदरात कपात करण्याची घोषणा बँकांनी केली आहे. छोट्या जमा रकमेवरही ही व्याजदर कपात होऊ शकते. त्यामुळे आता गुंतवणूकदारांना काय करावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही सध्या चांगला परतावा मिळाला, असे काही पर्याय आहेत. त्यात सर्वात चांगले गिल्ट फंड्स आहेत. ते कसे पाहा...
नोटाबंदीनंतर बँकांमध्ये अनपेक्षित पैसे जमा झाले आहेत. त्यामुळे बँकांकडे काही अतिरिक्त पैसे अाहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात पैसे आल्यामुळे जमेवरील व्याजदरात कपात होणे अपेक्षितच आहे. त्यात काही बँकांनी तर दरकपात केलीदेखील. ५० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त जमा रक्कम एसबीआयजवळ आहे. त्यामुळे एक कोटी रुपयांच्या वर जमा रकमेवर बँकेने व्याजदरात कपात केली आहे. आता कमी रकमेवरील व्याजदर कपात होण्याचीदेखील शक्यता दिसत आहे. जर आपण प्राप्तिकराच्या ३० टक्क्यांच्या स्लॅबमध्ये असाल तर एक ते दोन टक्के कपातीमुळे कोठेही पैसे लावणे त्रासदायक आहे. यामुळे अनेक गुंतवणूकदार चिंतेत आहेत. कोणत्याही इतर जागेऐवजी बँकांमध्ये पैसे जमा करणेच गुंतवणूकदारांना योग्य वाटत अाहे.
जमा रकमेवर कपात का - बँकांमध्ये जमा रकमेचे दर अनेक कारणांवर अवलंबून आहेत. यामध्ये बँकांमध्ये किती लवचिकता आहे, हे सर्वात महत्त्वाचे आहे. भारतीय रिझर्व्ह बँक या व्याजदरावर नियंत्रण ठेवते. गेल्या एक ते दोन वर्षांत आपण रिझर्व्ह बँकेने या रकमेवरील व्याजदरात कपात केल्याचे पाहिले आहे. सध्याची स्थिती तर अशी आहे, पोस्ट कार्यालयातील बचतीवर सर्वाधिक व्याज दिले जाते. तेथील व्याजदरातदेखील कपात करण्यात येईल. या कपातीनंतर बचतीवरील तसेच एफडीवरील व्याजाचे आकर्षण तेजीने कमी होईल.
डेब्ट म्युच्युअल फंडाची परिस्थिती - एक गुंतवणूक सल्लागार या नात्याने मी नेहमीच असेट अलोकेशनमध्ये डेब्ट म्युच्युअल फंडचा समावेश करण्यास सांगितले. कोणत्याही परिस्थितीत व असेट क्लासमध्ये आपल्याला फायदा मिळवण्याची संधी देऊ शकतो, हेच या मागचे कारण आहे. नोटाबंदीच्या निर्णयानंतर अनेक मोठ्या गुंतवणूक योजनेतील व्याजदरात कपात होत आहे. मात्र, सर्वात जास्त फायदा होतोय तो ‘लाँग टर्म सिक्युरिटीज’वर, ज्याच्या किमती अजूनही वाढलेल्या आहेत. १० वर्षांच्या गुंतवणुकीवरील व्याजदर कमी होऊन ६.५ टक्के राहिले आहे. जास्त कालावधीसाठी डेब्ट फंड्ससारख्या उत्पन्न देणाऱ्या फंड्स जे सरकारी योजनांमध्ये पैसे लावतात, यामधील परतावा अचानक वाढला आहे. आता हे तीन ते पाच वर्षांच्या कालावधीत इक्विटी फंडाला मागे टाकत आहे. आता ज्या गुंतवणूकदारांकडे लांॅग टर्म डेब्ट फंड्स पोर्टफोलिओमध्ये आहेत, त्यांना फायदा होत आहे. सध्याच्या परिस्थितीत गिल्ट फंडमध्ये सर्वाधिक फायदा होत आहे.
आपण काय करायला हवे -कोणत्याही गुंतवणुकीचा महत्त्वाचा भाग म्हणजे तुमच्या गुंतवणुकीचे वेगवेगळ्या भागात केलेले विभाजन होय. यामुळे विविध बाजारांतील गुंतवणुकीचे फायदे मिळतात. उदा. इक्विटी, डेब्ट गोल्ड आणि रिअल इस्टेट आदी क्षेत्रात धोरण बदलल्यास तेजी येण्याची शक्यता असते. कोणकोणत्या प्रकारच्या गुंतवणुकीत आपण किती पैसे ठेवू शकतो हे सर्वस्वी आपल्यावर अवलंबून आहे. एकाच प्रकारच्या असेट क्लासवर अवलंबून राहणे योग्य नाही.
बँकांमधील जमावरील व्याजदर कमी झाल्यास बँकांमध्ये जमा असलेले पैसे काढून घेऊन अचानक दुसऱ्या पर्यायाची निवड करणे फायद्याचे ठरेल का ही पुढील काळातली सर्वात मोठी चिंता आहे. हे खूपच अवघड आहे. कारण ‘शॉर्ट टर्म डिपॉझिट’चा दुसरा पर्याय ‘शॉर्ट टर्म डेब्ट म्युच्युअल फंड’ आहे. जर तुम्ही कोणाच्याही सल्ल्याशिवाय काम करत आहात तर एक गुंतवणूकदार म्हणून तुम्हाला याची पायाभूत माहिती असायला हवी. उदा. जर आपण एखाद्या फंडावरच अवलंबून राहिले आणि त्याने योग्य परतावा दिला नाही तर तुमचे नक्कीच नुकसान होईल. तरी या दरम्यान आपला फायदा करतील असे काही पर्याय आहेत. बँकांमध्ये भरपूर प्रमाणात पैसे पोहोचले आहेत. डेब्ट म्युच्युअल फंडामध्ये कमी कालावधीसाठी लिक्विड फंड्स, अल्ट्रा शॉर्ट टर्म फंड्स चांगले पर्याय ठरू शकतील. कमी कालावधीसाठी जे एक किंवा दोन वर्षांसाठी आहेत अशा शॉर्ट टर्म आणि मीडियम टर्म डेब्ट फंड्सचा एक चांगला पर्याय आहे. जर डेब्ट म्युच्युअल फंडामध्ये आतापर्यंत तुम्ही पैसे गुंतवलेलेच नसेल तर सध्या काही पैसे गुंतवून तुम्ही नंतर त्यात वाढ करू शकता. जास्त कालावधीसाठीची अल्प बचत योजना येथे सर्वाधिक पसंतीची आहे, तर ‘लाँग टर्म म्युच्युअल फंड’चाही चांगला पर्याय आहे.
फॅक्ट गेल्या अडीच वर्षांत म्युच्युअल फंडामध्ये एसआयपी दुपटीपेक्षाही जास्तने वाढले आहेत. मार्च २०१४ मध्ये एकूण एसआयपी ६० लाख होते, तर ऑक्टोबर २०१४ मध्ये एकूण एसआयपी १३४.५ लाख झाले.
जितेंद्र सोळंकी
सदस्य, फायनान्शियल प्लॅनर्स (गुंतवणूक सल्लागार),
गिल्ड ऑफ इंडिया
बातम्या आणखी आहेत...