आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Islamic Bank And Taurus Ethical Fund Works According To Shariah Norm

इस्लामिक बॅंक: खातेदारांना कर्ज देते पण आकारत नाही कोणतेही व्याज!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'शरिया' अथवा 'शरियत'वर आधारित इस्लामिक गुंतवणूक फिलोसोफीनुसार या इस्लामिक बॅंकेचा कारोभार चालतो. काही नियम व अटींनुसार ही बँक कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. फंडामेंटल प्रिंसिपल, जस्टिस, पारदर्शकता, कॉमन इंट्रेस्ट आणि खातेदारांच्या गरजेनुसार ही बॅंक त्यांना कर्ज उपलब्ध करून देते. मात्र, त्या बदल्यात त्यांच्याकडून एक रुपयादेखील व्याज आकारत नाही.

असे आहेत 'शरिया'नुसार गुंतवणुकीचे नियम...
'शरिया' सिद्धांताचे पालन करणार्‍या कंपन्यांमध्येच ही बॅंक गुंतवणूक करते. मात्र, या कंपन्यांना शेअर घेण्यास बँक परवानगी देत नाही. उदा. आर्थिक सेवेवर व्याज घेणार्‍या, मद्य, मांस, जुगार, नाइट क्लब, पोर्नसारख्या गोष्टींशी संबंधित असलेल्या कंपन्यांमध्ये ही बॅंक कोणतीही गुंतवणूक करत नाही.

देशातील मुस्लिम लोकांसाठी शरिया कायद्यानुसार तीन व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात इस्लामी बॅंक, टौरस एथिकल फंड (म्यूच्युअल फंड) आणि शरिया इंडेक्सचा समावेश आहे. चला तर मग जाणून घेऊया, या तीन व्यवस्थांचा कारोभार कसा चालतो ते...

इस्लामिक बॅंकिंग
इस्लामी कायदा अथवा शरियाच्या सिद्धांतावर काम करणार्‍या बॅंकिंग व्यवस्थेला इस्लामिक बँकिंग असे संबोधले जाते. या बॅंकेवर शरिया कायद्याचे नियंत्रण असते. या बॅंकेची सुरुवात मलेशियात झाली होती. या बॅंकेचे वैशिष्‍ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारचे व्याज दिले जात नाही वा घेतलेही जात नाही. बॅंकेला होणारा फायदा खाताधारांना विभागून दिला जातो.

इस्लामिक बॅंकेचा कारोभार एका इस्लामी दिग्गजांच्या समितीकडून पाहिला जातो. ही समिती बॅंकेला वेळोवेळी मार्गदर्शन करत असते. भारतात देखील अशा बॅंकांना आता परवानगी मिळाली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, शरिया इंडेक्सविषयी...