आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jitendra Solanki About On Mutual Fund Investment

निवृत्ती जवळ येतेय.. तर म्युच्युअल फंड निवडू शकता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निवृत्तीनंतरची चिंता सर्वांना असते. ज्यांना पेन्शन मिळणार नाही, त्यांच्यासाठी चिंता आणखी वाढते. निवृत्तीनंतर एखादी जबाबदारी शिल्लक राहत असेल तर परिस्थिती अवघडच बनते. चुकीची गुंतवणूक केली तर अडचणीचा डोंगर उभा राहतो. म्युच्युअल फंड तुम्हाला किती सुरक्षितता देतो याची माहिती जाणून घेऊया...

निवृत्ती जसजशी जवळ येत जाते आणि पैसे शिल्लक टाकलेले नसतील तर तुम्हाला संपत्ती विकून घरखर्च चालवावा लागेल. ही काही नवी बाब नाही. परंतु ढळत्या वयात जगणे मात्र अवघड होते. कारण अशा वेळी तुमच्याकडे अशा संपत्तीची गरज जास्त भासते. जर निवृत्तीनंतर चांगले प्रॉडक्ट मिळत असेल तर घेण्यास काहीच हरकत नाही.

दीर्घ कालावधीसाठीची गुंतवणूक असलेले काही पर्याय आहेत. यात पेन्शन प्लॅन, एनपीएस, जीवन विमा, सोने आणि रिअल इस्टेट आदींचा समावेश आहे. गुंतवणूक कशी निवडावी हे तुमचे मार्ग आणि सामर्थ्यावर अवलंबून असते. तरीही एनपीएस सोडून इतर काही पर्याय थोडे अवघड आहेत. एनपीएसलाही काही मर्यादा आहेत. तसे पाहता म्युच्युअल फंड निवृत्तीनंतरच्या बचतीसाठी चांगले असतात. म्युच्युअल फंडात कोणते फायदे निवृत्तीनंतर थोडा दिलासा देऊ शकतात ते जाणून घेऊया -

१. इक्विटीमध्ये खरेदी
जर संपत्तीमध्ये वाढ करायची असेल तर इक्विटीच्या तुलनेत दीर्घ अवधीसाठी पैसे लावण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. महागाईमुळे परताव्यावर परिणाम होतो. इक्विटी मात्र दीर्घकाळासाठी तुमच्या उद्दिष्टापर्यंत घेऊन जाते. इक्विटीमध्ये पैसे गुंतवणे इतके सोपे नाही. जर तुम्ही थेट शेअर्समध्ये पैसे गुंतवणार असाल तर तुमच्याकडे पुरेसा पैसाही हवा आणि कंपन्यांची माहिती हवी आहे. बहुतांश लोकांना ते जमत नाही. जर तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी पैसे लावू इच्छित असाल आणि तशी परिस्थिती असेल तर म्युच्युअल फंडाद्वारे ही उणीव भरून काढता येते. म्युच्युअल फंडाद्वारे दरमहा कमीत कमी १ हजार रुपये निवृत्तीसाठी गुंतवू शकता. यात तुमचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवले जातात.

२. अन्य योजना
म्युच्युअल फंडात दुसरा फायदा असा की, यात काही योजना आहेत. लार्ज कॅप, मिड कॅप, मल्टी कॅप किंवा सेक्टरल फंड आहेत. यात डेटमध्ये तितकेच वैविध्य गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असते. उदा. मनी मार्केट फंड, इन्कम फंड, गिल्ट फंड. जितकी जोखीम गुंतवणूकदार घेऊ शकतात त्यानुसार या योजना आहेत. तुम्ही आक्रमक पद्धतीने पैसे गुंतवणार असाल तर मिड कॅपमध्ये जाता येते. जर गुंतवणुकीत चढउतार नको असतील तर लार्ज कॅपमध्ये पैसे लावले जाऊ शकतात.

३. कमी खर्च
कोणत्याही दीर्घ अवधीच्या गुंतवणुकीत याच्या खर्चाचा प्रामुख्याने विचार केला जातो. कारण खर्च जास्त येत असेल तर तुम्हाला मिळणाऱ्या नफ्यावर याचा परिणाम होतो. यात महागाई आणि कर जोडल्यास तिन्ही बाजूंनी नुकसान होते. यामुळे विमा उत्पादनाचा यात विचार केला जाऊ शकत नाही. म्युच्युअल फंडात या उद्देशाची पूर्तता होते. म्युच्युअल फंड कराच्या दृष्टीने जवळचे आहेत. कारण इक्विटीवर लाँग टर्म कॅपिटल गेन कर शून्य आहे. डेटपुरते बोलायचे झाल्यास ते इंडेक्सेशनसह २० टक्के आहे. दुसरे, असा काही खर्च गुंतवणूकदारासमोर नसतो. वर्षाच्या शेवटी जो खर्च असतो त्यातून ही रक्कम वळती केली जाते. जर तुम्ही प्राप्तीवर लक्ष द्याल तर जो खर्च कमी करण्यात आला आहे, त्याचा परिणाम परताव्यावर होतो. म्युच्युअल फंडात गुंतवणूकदारास कमी खर्चाचा फायदा मिळतो. तो दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केलेली असली तरी मिळतो.

४. जास्तीची तरलता
निवृत्तीनंतरची तयारी करत असाल तर वेगवेगळी परिस्थिती असते. यात तुम्ही पैसे गुंतवले असतील तर ते योग्य पद्धतीने काम करत नसतील. निवृत्ती जवळ येत असेल तर इक्विटीमध्ये गुंतवणूक कमी केली पाहिजे. यासाठी निवृत्तीसाठी पैसे शिल्लक टाकत असाल तर म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा.

>वस्तुस्थिती
आजही बचतीसाठी पोस्ट ऑफिसमध्ये असलेल्या बचत योजनेवर अवलंबून राहावे लागते. एका सर्व्हेनुसार ३९.६७ टक्के कुटुंबे यात पैसे गुंतवतात.

(लेखक फायनान्शियल गिल्ड ऑफ इंडियाचे सदस्य आहेत.)