नवी दिल्ली- बँकेचे ग्राहक आणि विमाधारकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने अनेक नियम बनविले आहेत. आज आम्ही तुम्हाला त्यातीलच काही नियमांची माहिती देणार आहोत. याद्वारे तुम्ही तुमच्या हक्कांचे सरंक्षण करु शकाल.
विमा योजना रद्द करण्याचा हक्क
जीवन विमा योजना किंवा आरोग्य विमा योजना खरेदी केल्यानंतर ती रद्द करण्याचा तुम्हाला हक्क आहे. योजनेचे कागदपत्रे मिळाल्यानंतर 15 दिवसांच्या आत तुम्हाला हे करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची पेनल्टी बसणार नाही. फक्त काही अर्ज भरुन ती कंपनीमध्ये जमा करावी लागतील. ही सुविधा 3 वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळाच्या सर्व जीवन विमा योजना व आरोग्य विमा योजनेसाठी लागू होते.
पुढील स्लाइडवर वाचा, बँक तुम्हाला त्रास देऊ शकत नाही...