आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पैशांबाबत महिला पुरुषांच्या तुलनेत जास्त आत्मनिर्भर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यूयॉर्क - आता ५० वर्षांपूर्वीसारखी स्थिती राहिली नसून तरुण मुली पुरुषांच्या तुलनेत जास्त आत्मनिर्भर आहेत. या दरम्यान नोकरदार महिलांची संख्या ३२.२ टक्क्यांनी वाढली आहे. महिला स्वत:च्या गरजेनुसार उत्पन्न मिळवत आहे. अमेरिकेच्या कामगार सांख्यिकी ब्यूरोच्या आकडेवारीनुसार १९५० मध्ये कामगारांच्या संख्येत महिलांची भागीदारी ३४ % होती. २०१३ मध्ये हा आकडा वाढून ५७.२ टक्क्यांवर पोहाेचला आहे. बँक ऑफ अमेरिकेच्या वतीने करण्यात आलेल्या अभ्यास अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या सर्व्हेमध्ये १८ ते २६ वर्ष वयोगटातील युवकांची त्यांच्या पैशाच्या सवयी बाबतची मते जाणून घेण्यात आली होती.
नोकरीमधील स्थिरता वाढल्यामुळेच महिलांच्या स्थितीमध्ये ही सुधारणा झाली असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. महिला स्वत:च्या गरजा पूर्ण करण्याबाबत जास्त स्वतंत्र झाल्या आहेत. सर्व्हेमध्ये सुमारे प्रत्येक श्रेणीच्या महिलांनी सांगितले की, त्या पुरुषाच्या तुलनेत जास्त आर्थिक जबाबदारी पार पाडत आहेत. त्या पैशाची बचत करत आहेत, कर भरत आहेत आणि आरोग्य विम्याचा खर्चही स्वत:च उचलत आहेत. महिलांना सहकारी पुरुषांच्या तुलनेत कमी पगार दिला जातो, तरीदेखील महिला उत्पादनावर पुरुषांच्या तुलनेत जास्त खर्च करत असल्याने अनेक अभ्यास अहवालात सांगण्यात आले आहे. अनेक युवकांच्या मते वयाच्या १८ वर्षांपर्यंत ते तरुण झाले असे मानत नाही.
सुमारे ६२ टक्के युवकांनी सांगितले की, त्यांनी १९ व्या वर्षी आर्थिक स्वरूपात आत्मनिर्भर झाल्यानंतर स्वत:ला “तरुण’ मानले. बँक ऑफ अमेरिकाने यूएसए टुडेसोबत संयुक्तपणे जुलै महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यांत २,१८० तरुणांमध्ये हा सर्व्हे केला होता.

अमेरिकेत अजूनही स्वत:च्या भरवशावर राहणे अवघड
^ अनेक प्रयत्नानंतरही अमेरिकेच्या नागरिकांसाठी आर्थिक स्वरूपात स्वतंत्र होणे खूपच अवघड आहे. प्रत्येक तीनपैकी एका विद्यार्थ्यावर कर्जाचे ओझे आहे. २५ ते २९ वयोगटातील ३१ टक्के युवक अजूनही आई-वडिलांसोबत राहत आहेत. पालकांपासून स्वतंत्र राहणे खूपच अवघड असल्याचे त्यांना वाटते -अँड्रयू प्लेप्लर, कार्यकारी व्यवस्थापक, बँक ऑफ अमेरिका
भारतात महिलांची भागीदारी कमी
भारतातील एकूण कामामध्ये महिलांची भागीदारी जगात सर्वात कमी फक्त २४ टक्के आहे. याबाबत सिक्कीम सर्वात वर असल्याचे संशोधन संस्था सीएसअायएस आणि नाथन असोसिएट्सच्या अभ्यासात समोर आले आहे. तर दिल्ली सर्वात खाली आहे. सिक्कीमला १०० पैकी ४० आणि दिल्लीला फक्त ८.५ अंक देण्यात आले आहेत. सिक्कीमनंतर तेलंगणा (२८.५ अंक), पुद्दुचेरी (२५.६), कर्नाटक (२४.७ अंक) आणि हिमाचल प्रदेश (२४.२) सर्वात वरच्या क्रमांकावर आहेत.
बातम्या आणखी आहेत...