आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँका लवकरच कर्ज स्वस्त करतील : शक्तिकांत दास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - रिझर्व्ह बँकेच्या वतीने व्याजदरात कपात केल्यानंतर येत्या काही दिवसांतच काही बँका व्याजदरात कपात करतील, अशी अपेक्षा वित्त विभागाचे सचिव शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी व्यक्त केली. बँकांची स्वायत्तता आणि सरकारच्या राजकोशीय घाट्याचे उद्दिष्ट ३.५ टक्क्यांवर कायम ठेवण्याची कटिबद्धता त्यांनी व्यक्त केली.

सरकारने छोट्या बचत योजनेतील व्याजदरांना नव्याने निश्चित करून मजबुतीचे संकेत दिले आहेत. महागाईदेखील नियंत्रणात आहे. सरकारच्या वतीने अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामुळे आता रिझर्व्ह बँकेच्या व्याजदर कपातीनंतर त्याचा लाभ बँका ग्राहकांना देतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

वास्तविक कर्जाच्या "मार्जिनल कॉस्ट'च्या आधारावर व्याजदर निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे व्याजदरात कपात होण्याची प्रक्रिया आधीच सुरू झाली होती. त्यात आता आणखी भर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पात कृषीला महत्त्व
आर्थिक घडामोडींमध्ये ग्रामीण भागातील मागणीवर बोलताना ते म्हणाले की, सरकारने अर्थसंकल्पात कृषीला विशेष महत्त्व दिले आहे. सलग दोन वर्षांपासूनचा दुष्काळ आणि अवकाळीमुळे ग्रामीण भागातील खर्चाचे प्रमाण कमी झाले आहे. सरकारने कृषी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी उपाययोजना केल्या अाहेत.

८ ते ८.५ टक्के विकासदर
सरकार येत्या काळात ते ८.५ टक्के विकासदर मिळवण्यात यशस्वी होण्यासाठी कटिबद्ध असल्याचे दास यांनी सांगितले. यामुळे देशांतर्गत मागणीत वाढ करण्यावर सरकारने लक्ष केंद्रित केले आहे. त्यासाठी प्रत्यक्ष पैशापेक्षा इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करून मागणी वाढवण्यावर सरकारचा भर असल्याचे त्यांनी सांगितले.

कमी गुंतवणुकीची अर्थव्यवस्था
देशातकमी गुंतवणुकीची अर्थव्यवस्था बनवण्याची आवश्यकता असल्याचे मत दास यांनी व्यक्त केले. मी जेव्हा कमी गुंतवणूक म्हणतो त्या वेळी त्याचा अर्थ कमी मजुरी असा घेता सरकारच्या उपायांमुळे व्यवसाय सुलभ बनवण्यासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीचा विचार आहे. गेल्या दोन वर्षांत सरकारच्या प्रयत्नांमुळे गुंतवणूक कमी होण्याची अपेक्षा वाढली आहे. देशात व्यवसाय करण्यासाठी गुंतवणूक आणि कर दोन्ही कमी करण्याच्या दृष्टीने अर्थव्यवस्थेकडे पाहत असल्याचे दास यांनी सांगितले.