आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loans Begin To Cheaper With New Interest Rated Formula implemented By Banks

खुशखबर! Home Loan स्वस्त, आजपासून बॅंकांनी लागू केला न्यू रेट फॉर्म्युला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- आजपासून (1 एप्रिल) नवे आर्थिक वर्ष सुरु झाले आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्यासाठी खुशखबर आहे. ती म्हणजे, बॅंकाचे गृहकर्ज स्वस्त होणार आहे. बॅंकांनी नव्या बेस रेट फॉर्म्युल्यानुसार गृहकर्जावरील व्याजदरात कपात करण्याचे घोषणा केली आहे. स्टेट बॅंक ऑफ इंडिया व एचडीएफसी बॅंकेने पुढाकार घेऊन या निर्णयाची अमंलबजावणी केली आहे.

दुसरीकडे, बॅंका ऑफ बडोदाने देखील नव्या फॉर्म्युल्यानुसार बेस रेट निर्धारित करण्याचा निर्णय घेतला आहे. देशातील राष्ट्रीय तसेच खासगी बॅंका देखील यासंदर्भात विचाराधीन असून त्या लवकरच गृहकर्जाच्या व्याजदरात कपात करण्‍याची घोषणा करू शकतात.

आरबीआयचे गव्हर्नर नाराज झाल्यानंतर घेतला निर्णय...
- आरबीआयने बॅंकांना एक एप्रिलपासलन मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड लेंडिंग रेटच्या आधारावर आपले बेस रेट निर्धारित करण्‍याचे निर्देश दिले होते.
- मागील आर्थिक वर्षात आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याकडे यासंदर्भात तक्ररी आल्या होत्या. आरबीआयद्वारा कपात करण्‍यात आलेल्या रेपो रेटनुसार बॅंका आपल्या व्याजदरात कपात करत नसल्याचे तक्रारीत म्हटले होते.
- यानंतर आरबीआने नवा बेस रेट फॉर्म्युला एक एप्रिल 2016 पासून लागू करण्‍याचे निर्देश देशातील बॅंकाना दिले होते.

एसबीआयने नवा फॉर्म्युला केला लागू...
- एसबीआयने आयबीआयच्या निर्देशानुसार, एक एप्रिलपासून नवा फॉम्युला लागू केला आहे. एसबीआयने 9.3 टक्क्यांऐवजी एक ते तीन वर्षादरम्यान 9.2 टक्के केला आहे.
- गृहकर्जाचा व्याजदर 9.5 टक्क्यांवरून 9.4 टक्के केला आहे.

एचडीएफसीने नेमके केले काय?
- एचडीएफसी बॅंकेने आपला बेस रेट 9.2 टक्के केला आहे. आधी हा रेट रेट 9.3 टक्के होता.
- मात्र, एचडीएफसीच्या या न‍िर्णयाचा गृहकर्जाच्या मासिक हप्त्यात (ईएमआय) कोणताही बदल होणार नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
- बँंकेच्या या निर्णयाचा वाहन कर्जासह इतर कर्जात लाभ मिळू शकतो.

आयसीआयसीआयचा दर मात्र जैसे थे...
- आयसीआयसीआय बॅंकेने एक कोटी रुपयांपेक्षा जास्त डिपॉजिटवरील व्याजदरात आधीच 0.55 टक्के कपात केली आहे.
- मात्र, अद्याप बॅंकेने बेस रेटमध्ये कपात केल्याची घोषणा केलेली नाही. बॅंक लवकरच गृहसह वाहन कर्ज व इतर कर्ज स्वस्त झाल्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, 5 एप्रिलपासलन ईएमआयमध्ये होईल कपात.....