आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Low Interest Rates Loan ,No Need To Personal Loan

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अल्‍प व्‍याजदरात मिळवा कर्ज,पर्सनल लोनची पडणार नाही गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- दैनंदीन गरजा भागवण्‍यासाठी पैशांची गरज प्रत्‍येकांना पडते. ज्‍यांचे पगार लांबले, किंवा इतर कामासाठी मोठया रक्‍कमेची गरज असेल तर त्‍या गरजा पूर्ण करण्‍यासाठी बँकेकडून कर्ज घ्‍यावे लागते. बँकेत पर्सनल लोनसाठी कमी अटी व सहज मिळत असल्‍याने पर्सनल लोन घेणा-यांची संख्‍या जास्‍त आहे. मात्र, या लोनवर व्‍याजदर जास्‍त आकारला जातो. परंतु आम्‍ही आपल्‍याला अल्‍प कालावधीत कमी व्‍याजदरात कर्ज कसे घेता येईल, या विषयी माहिती देत आहोत.
शेअर्सच्‍या रकमेवर किती मिळेल व्‍याज
बँका शेअर्सच्‍या मोबदल्‍यात लोन देतात.जे शेअर्स एक वर्ष ते 30 महिन्‍यांसाठी खरेदी केलेले आहेत, त्‍यावर बँक शेअरच्‍या 50 टक्‍के लोन देते. तर आपल्‍या जवळ 20 लाख रूपयांचे शेअर्स असतील तर आपल्‍याला एखादी बँक 10 लाख रूपयांपर्यंत लोन देऊ शकते. कधी ठराविक कालावधीसाठी बँका 20 लाख रूपयांपर्यत लोन ऑफर देतात. स्‍टेट बँक ऑफ इंडिया कमीतकमी 50 हजार रूपये तर खासगी बँका एक लाख रूपयांची लोन ऑफर देते
किती आहे व्‍याजदर
शेअर्सच्‍या मोबदल्‍यात कर्जावर व्‍याजदर 10 ते 13.60 टक्‍के दरम्‍यान आहे. ICICI बँक शेअर्सच्‍या मोबदल्‍यात 10.20 टक्‍के व्‍याजदराने लोन देते, Axis Bank 10.50 ते 12.50, HDFC Bank 10. 50 ते 13.60 व SBI 12.70 टक्‍के व्‍याजदराने कर्ज देते.
पुढील स्‍लाईडवर वाचा शेअर्सवर कर्ज मिळण्‍याच्‍या अटी...