आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Make Money Online With Google By Advertise On Your Blog

Google Adsense मधून असे कमवा पैसे, हे आहेत इतर ऑनलाईन माध्यम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनेटवर सर्फिंग करताना जर तुम्ही पैसे कमवू शकत असाल तर किती चांगले होईल ना... यासाठी घराबाहेर जाण्याचीही गरज नाही. अगदी घरबसल्या अशा प्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता. आज आम्ही तुम्हाला Make Money Online च्या वेगवेगळ्या पद्धती सांगणार आहोत. गुगलमध्येही काही अशा सुविधा आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्ही बक्कळ पैसे कमवू शकता.

काय करावे लागेल
Google Adsense जगातील सर्वात जास्त पैसे देणारे Ads Network आहे. तुम्ही जर तुमचा ब्लॉग बनवला असेल तर तुम्हाला Google Adsense साठी apply करावे लागेल आणि google ने स्वीकृती दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉगवर Advertisement करावी लागेल. म्हणजेच Google Adsense ने बनवलेल्या जाहिरातींचे कोड तुम्हाला तुमच्या ब्लॉगमध्ये लावावे लागतील. जसे तुमच्या ब्लॉगमध्ये ads सुरू होतील तसे तुम्हाला पैसे मिळण्यास सुरुवात होईल. Google तुम्हाला हे पैसे दर महिन्याला देते जे सरळ तुमच्या बँक अकाऊंटमध्ये येतात. गुगल चेकद्वारेसुध्दा तुम्हाला हे पैसे देते.
काय आहेत अटी
या प्रकारे पैसे कमावण्यासाठी गुगलच्या काही अटी आहे. गुगलकडून पैसे घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या अकाऊंटवर 100 डॉलर (त्या दिवसाच्या किमती नुसार) म्हणजेच 6300 रुपये ठेवावे लागतील. तेव्हाच गुगल तुम्हाला पैसे पाठवेल. जर गुगलने झालेली तुमची कमाई 100 डॉलरपेक्षा कमी असेल तर गुगल तुमच्या अकाऊंटमध्ये पैसे पाठवणार नाही. प्रत्येक महिन्याच्या हिशोबाने तुम्ही Google Adsense ने जेवढे पैसे कमवाल ते तुमच्या गुगल खात्यात जमा होईल. मात्र 100 डॉलर होईपर्यंत गुगल तुमच्या पर्सनल अकाऊंटवर पैसे पाठवणार नाही.

कसे मिळतात जाहिराती
Google adsense तुम्हाला अनेक प्रकारच्या जाहिराती देते. उदा. वीडियो, फोटो, टेक्स्ट, बॅनर इत्यादी. तुम्ही यापैकी तुमच्या ब्लॉगसाठी योग्य असणारे, तुमच्या आवडीच्या जाहिराती लावू शकतात.

पुढील स्लाईडवर वाचा, काय आहे गुगलसोबत पैसे कमावण्याच्या पध्दती..

नोट- फोटोंचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे.