आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्याजदर घटणार; ७ टक्के ठेवण्याची शक्यता : मुडीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- संशोधन संस्था मुडीज अॅनालिटिक्सने भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) मंगळवारी होण्याऱ्या पतधोरणाच्या आढाव्यात ०.२५ टक्के व्याजदर कमी करण्याची शक्यता वर्तवली आहे. सर्वसाधारण पाऊस आणि सोन्याच्या किमती कमी होत असल्यामुळे महागाई कमी होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक बाजदर कमी करण्याची शक्यता असल्याचे मत मुडीजने नोंदवले आहे. मुडीजने अहवाल "एशिया स्पॉटलाइट : मोर रेट कट्स इन इंडिया’ मध्ये रिझर्व्ह बँक व्याजदरात कमी करून ते ७ टक्के ठेवण्याची शक्यता वर्तवली आहे.

सामान्यापेक्षा कमी पाऊस पडण्याचा अंदाज चुकीचा ठरला असून सध्या तरी चांगला पाऊस पडला असल्याचा अंदाज मुडीजने वर्तवला आहे. त्यामुळे खरिपाची पेरणी वाढली असून उत्पादनात वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशा स्थितीत अन्नधान्याची बाजारात आवक वाढल्यास महागाई कमी होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे व्याजदर कमी करण्याचा रिझर्व्ह बँकेकडे चांगली संधी असल्याचे मत मुडीजने व्यक्त केले आहे. आंतराष्ट्रीय बाजाराचा विचार केल्यास सोने आणि कच्च्या तेलाच्या किमती सलग कमी होत आहे. इराणच्या करारामुळे कच्च्या तेलाची आवक वाढली आहे. यामुळे व्याजदरात कपात करणे योग्य असल्याचे मुडीजने म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...