आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुमच्याकडे 30 लाखांपेक्षा जास्त प्रॉपर्टी आहे? मोदी सरकारला द्यावा लागेल हा हिशोब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत सरकार ३० लाखांपेक्षा जास्त किमतीच्या प्रॉपर्टीची माहिती मिळवणार आहे. त्यानंतर संबंधित प्रॉपर्टी काळ्यापैशांतून खरेदी करण्यात आली आहे, की त्यासाठी कष्टाचा पैसा वापरला आहे हे तपासले जाईल. तसेच अशा ओनर्सचा टॅक्स प्रोफाईलही चेक केला जात आहे. त्यासाठी इन्कम टॅक्स रिटर्नची माहिती चेक केली जात आहे. अशा प्रकारच्या प्रॉपर्टीच्या खरेदीत काळ्या पैशांचा वापर केला जातो असा संशय सरकारला आहे.

 

प्रॉपर्टी ओनर्सच्या टॅक्स प्रोफाईलची तपासणी
इन्कम टॅक्स डिपार्टमेंट बेनामी प्रॉपर्टी अॅॅक्ट अंतर्गत अशा लोकांच्या टॅक्स प्रोफाईल चेक करत आहे, ज्यांनी ३० लाखांपेक्षा जास्त किमतीची प्रॉपर्टी रजिस्टर केली आहे. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सचे (सीबीडीटी) चेअरमन सुशिल चंद्रा यांनी सांगितले, की डिबार करण्यात आलेल्या कंपन्या आणि त्याचे डायरेक्टर्स यांचीही तपासणी करण्यात येत आहे.

 

बेनामी अॅक्ट अंतर्गत ६२१ प्रॉपर्टी अटॅच
आयटी डिपार्टमेंट चीफ यांनी सांगितले, की बेनामी प्रॉपर्टी अंतर्गत ६२१ प्रॉपर्टी अटॅच करण्यात आल्या आहेत. त्यात काही बॅंक अकाऊंटची सामिल आहेत. यात सुमारे १८०० कोटी रुपयांची प्रॉपर्टी असल्याची माहिती आहे.

 

पुढील स्लाईडवर वाचा, अशी केली जात आहे चौकशी....

बातम्या आणखी आहेत...