आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डिजिटल माध्यमांच्या अधिक वापराने कामावर परिणाम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यश मिळविण्यासाठी साधारणत: समज हाच असतो की कष्ट करा, तोपर्यंत कष्ट करा जोपर्यंत यश मिळत नाही; पण हीदेखील एक सामान्य गोष्ट आहे की जेव्हा आपल्याकडे कामाचे अधिक प्रेशर असते तेव्हा आपण पूर्वीच्या अपेक्षेत कमी उत्पादक होताे. तणाव आरोग्यासाठी नुकसानदायक असतो आणि उत्तम आरोग्याविना प्रभावी व्यक्तिमत्त्व होणे अशक्यच आहे. तेव्हा हे कसे शक्य आहे की कष्टाळू व्यक्ती सातत्याने कामही करेल आणि उत्पादकतेसह आरोग्यही कायम राखेल.  
 
... उत्पादकता होते कमी  
आमच्याकडे उत्तम इंटरनेट आणि तंत्रज्ञान आहे, जे काम वेगाने करण्यात लाभदायी आहे, पण ऑनलाइन होत चाललेल्या जगात आम्ही फोनच्या लागलेल्या सवयीला दुर्लक्षित करू शकत नाहीत. बहुतांश कंपन्यांत उशिरा रात्री काम चालते, जे ना कंपनीसाठी उत्पादक आहे, ना कर्मचाऱ्यांसाठी. आम्हाला हे शिकावे लागेल की अनेक गोष्टी कशा नियोजनपूर्वक आधीच करता येऊ शकतात. जेणेकरून त्यांना पूर्ण करण्यासाठी कोणत्याही प्रकारे गडबड होऊ नये. आपल्या कामाची प्राथमिकता निर्धारित करा. यामुळे आपण महत्त्वपूर्ण गोष्टी आधीच केल्या तरच यशस्वी होऊ शकाल. हे म्हटले जाते की, यात त्यांना आनंद मिळतो आहे. याशिवाय अनेक शोधात ही गोष्ट समोर आली आहे की डिजिटल माध्यमांचा उपयोग आणि विशेषत: सोशल मीडियाच्या वापराने तणाव आणि नकारात्मकता वाढण्याचा धोका होताे. जेव्हा आपण एकदा का यास नियंत्रणात घ्याल तेव्हा आपणास असे दिसेल की आपण अधिक उत्तमपणे आणि वेगाने काम करत आहात.  
 
कामातून विश्रांती घेणे   
कामाच्या दरम्यान ब्रेक-विश्रांती घेणेही महत्त्वाचे आहे. सुटीवर जाण्यासाठी वेळ तर काढाच, पण यासह दररोजच्या कामादरम्यानच थोडा ब्रेक घेत जा. चांगल्या मित्रांशी बोलत राहा अथवा पुस्तक वाचा. सुट्यांमध्येही प्रयत्न हाच असला पाहिजे की तुमची उपकरणे म्हणजे फोन आदी बंद ठेवा. सोशल मीडियामध्ये वेळ घालविण्यापेक्षा वास्तवात लोकांना भेटणे अधिक आनंद देणारे असते. यामुळे मेंदूही तल्लख होतो. नव्या लोकांना भेटण्याने नवनव्या कल्पना मिळतातच. यासह माहितीही वाढते.  
 
ध्यानधारणा आणि व्यायाम  
फिट राहण्यात व्यायाम मदत करतोच. यामुळे आपण कामात अधिक अॅक्टिव्ह आणि उत्पादक राहू शकता. ध्यानधारणेने आपला मेंदू शांत आणि एकाग्र ठेवण्यात मदत मिळते.
बातम्या आणखी आहेत...