न्यूयॉर्क - ज्या कंपन्यांत ३० टक्क्यांहून जास्त महिला कार्यकारी पदावर आहेत त्या कंपन्या सहा टक्क्यांपर्यंत जास्त नफा मिळवतात, असा निष्कर्ष अमेरिकेच्या पीटरसन संस्थेने केलेल्या अभ्यासात समोर आला आहे. वॉशिंग्टनस्थित पीटरसन संस्थेने ९१ देशांतील २१,९८० नोंदणीकृत कंपन्यांत केलेल्या संशोधनावर हा निष्कर्ष काढला आहे.
विशेष म्हणजे यात एक विरोधाभासदेखील आहे. एखाद्या कंपनीची सीईओ महिला असेल तर त्या कंपनीच्या कामगिरीवर फारसा फरक पडत नाही. मात्र कार्यकारी पदांवर महिला असतील तर मात्र खूप फरक पडतो. येथे कार्यकारी पद म्हणजे व्यवस्थापकीय पदांवरील महिला असा अर्थ आहे. यात कार्यकारी मंडळावरील महिलांचा संबंध नाही. व्यवस्थापकीय पदांवर ३० टक्के महिला असतील तर त्या तुलनेत तेवढ्याच प्रमाणात व्यवस्थापकीय पदांवर महिला असलेल्या कंपनीच्या तुलनेत टक्का नफा जास्त होईल. मॅकेन्झी ग्लोबल इन्स्टिट्यूटच्या आधारे अहवालात म्हटले आहे की, महिलांच्या बाबतीत भेदभाव झाल्यास जगाचा आर्थिक विकास (जीडीपी) २५ टक्के वाढू शकतो. अहवालानुसार, वित्तीय क्षेत्रात महिला आणि पुरुष समान संख्येने प्रवेश करतात. मात्र मध्यम व्यवस्थापकीय पदांवर महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत निम्म्यावर राहते. म्हणजेच नेतृत्वगुणाच्या पदावर पोहोचण्याची त्यांची शक्यता कमी होते. वाहतूक, लॉजिस्टिकसारख्या क्षेत्रात महिलांचे प्रमाण कमी आहे. मात्र या क्षेत्रात मध्यम व्यवस्थापन किंवा त्यावर जाण्याची शक्यता जास्त असते. वित्तीय कंपन्यांत व्यवस्थापकीय पदावरील महिलांचे प्रमाण १८ टक्के तर कार्यकारी मंडळावरील महिलांचे प्रमाण १३ टक्के आहे. तंत्रज्ञान क्षेत्रात हे प्रमाण अनुक्रमे १२ टक्के आणि टक्के आहे.
या अभ्यासात अनेक आश्चर्यकारक बाबी समोर आल्या आहेत. सुमारे ६० टक्के कंपन्यांतील कार्यकारी मंडळात एकही महिला नाही. प्रत्येकी दहा कंपन्यांपैकी तीन कंपन्यांत व्यवस्थापकीय पद किंवा मंडळात एकही महिला नाही. केवळ ४.५ टक्के कंपन्यांत महिला सीईओ आहेत. सर्वेक्षणात सहभागी १,३०,००० कार्यकारी मंडळ सदस्यांत महिलांचे प्रमाण केवळ ११ टक्के होते. या कंपन्यांत एकूण १,४४,००० व्यवस्थापकीय पदे होती. त्यापैकी केवळ १४ टक्क्यांची जबाबदारी महिलांकडे होती.
काही देशांत कंपन्यांच्या कार्यकारी मंडळावरील महिलांचे प्रमाण निश्चित करण्यात आलेले आहे. आइसलँड, नाॅर्वे, स्पेनमधील नोंदणीकृत कंपन्यांच्या मंडळात ४० टक्के महिला असणे आवश्यक आहे. ब्राझील, फिनलँडमधील सरकारी कंपन्यांतही हे प्रमाण ४० टक्केच आहे. मात्र ही जबाबदारी पेलण्यास योग्य महिलांची येथे वानवा आहे.
भारत : केवळ टक्के कंपन्यांत महिला आघाडीवर
भारतातकेवळ टक्के कंपन्यांत महिला महत्त्वाच्या पदांवर आहेत. नोंदणीकृत कंपन्यांच्या कार्यकारी मंडळात त्यांचा वाटा केवळ टक्के आहे. कंपनीच्या कार्यकारी मंडळात किमान एक महिला असावी, असा नियम दोन वर्षांपूर्वी लागू झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराने (एनएसई) १५१६ नोंदणीकृत आणि २१५ अनोंदणीकृत कंपन्यांचा डाटाबेस तयार केला आहे. त्यांच्या मते, या कंपन्यांत १४४९ महिला संचालक आहेत. या महिला एकूण २००१ संचालकपदे सांभाळताहेत. याचाच अर्थ किमान ५५२ महिलांकडे एकापेक्षा जास्त कंपन्यांचे संचालकपद आहे. एनएसईच्या ५९ नोंदणीकृत कंपन्यांत अद्याप एकही महिला संचालक नाही.