आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mutual Funds Log Rs 1 Lakh Crore Inflows In April May

म्युच्युअल फंडात दाेन महिन्यांमध्ये एक लाख काेटी रुपयांची गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - चालू अार्थिक वर्षाच्या पहिल्या दाेन महिन्यांमध्ये गुंतवणूकदारांनी विविध म्युच्युअल फंड याेजनांमध्ये जवळपास एक लाख काेटी रुपयांची गुंतवणूक केली अाहे. गुंतवणुकीचे प्रमाण हे गेल्या अार्थिक वर्षातल्या याच कालावधीतील १.४६ लाख काेटी रुपयांच्या तुलनेत थाेडेसे कमी अाहे.

असाेसिएशन अाॅफ म्युच्युअल फंड्स इन इंिडया या संस्थेने उपलब्ध करून िदलेल्या अाकडेवारीनुसार एप्रिल अाणि मे महिन्यात गुंतवणूकदारांनी १.१२ काेटी रुपयांची गुंतवणूक केली अाहे.
समभागांशी िनगडित फंडांमध्ये गुंतवणूकदारांचा वाढलेला सहभाग हा म्युच्युअल फंड उद्याेगासाठी सकारात्मक अाहे. विशेष म्हणजे अलीकडच्या काळात बाजारात चढ-उताराचे वातावरण असतानाही गुंतवणूकदारांनी समभाग याेजनांबाबत िनधी व्यवस्थापक सकारात्मक असल्याचे मत क्वांटम एएमसी असाेसिएटचे िनधी व्यवस्थापक (समभाग) नीलेश शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे गुंतवणूकदारांनी मनी मार्केटमध्ये ८६ हजार काेटी रुपये, तर समभाग याेजनांमध्ये २०,२५६ काेटी रुपयांची गुंतवणूक केली अाहे.