आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळा पैसा असणाऱ्यांवर ३० सप्टेंबरनंतर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- ३० सप्टेंबरनंतर आयकर विभाग काळा पैसा ठेवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार आहे. याआधी ज्यांनी काळ्या पैशाचा खुलासा केलेला नाही अशांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. एकाच वेळी ९० दिवसांत अशा काळ्या पैशाचा खुलासा करण्यासाठी दिलेली मुदत ३० सप्टेंबरपर्यंत संपते. त्यानंतर अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्यात येणार आहे, असा इशारा सीबीडीटीच्या प्रमुख अनिता कपूर यांनी सोमवारी दिला.
आयकर विभागाच्या अव्वल धोरण ठरवणाऱ्या केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाच्या (सीबीटीडी) प्रमुख असलेल्या कपूर यांनी दिलेल्या वेळेच्या आत या एक खिडकी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनही केले. ज्यांना या योजनेचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्यासाठी, अॅँटी-हरॅशमेंट आणि प्रो-कॉन्फिडेन्शियलिटीसंबंधीच्या सर्व प्रकारच्या प्रक्रिया लागू होणार असून यामुळे त्यांना कोणताच त्रास होणार नाही. ते ३१ डिसेंबरपर्यंत कर आणि दंडाची रक्कम भरू शकतात.