आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डाळी, खाद्यतेल आणखी वर्षभर नियंत्रणाखाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- डाळी आणि खाद्यतेलांच्या किमती वाढत असल्यामुळे सरकारने डाळी आणि तेलबियांवरील नियंत्रणात आणखी एक वर्षाची वाढ केली आहे. जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत आधीचा आदेश ३० सप्टेंबरला संपणार आहे. आता त्याचा कालावधी ३० सप्टेंबर २०१६ पर्यंत वाढवण्यात आला आहे. यामध्ये साठेबाजी आणि नफावसुलीवर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकारांना अधिकार देण्यात आले असून साठा मर्यादा ठरवण्याचा अधिकार राज्यांना देण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत माहिती तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी पत्रकारांना माहिती दिली. या खाद्यपदार्थांवर सप्टेंबर २०१४ पासून सरकारी नियंत्रण लागू आहे.
कांदा आणि डाळींची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारच्या वतीने अनेक उपाययोजना करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. उडीद आणि तूरडाळीचा वायदा बाजारदेखील निलंबित करण्यात आला आहे. तसेच डाळींची निर्यात पूर्णत: बंद करण्यात आली असून आयातीवर कोणत्याच प्रकारचे शुल्क लावण्यात आलेले नाही. डाळींची उपलब्धता वाढवण्यासाठी पाच हजार टन उडीद आणि तितकीच तूरडाळ आयात करण्यात आली आहे.