आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने गुंतवणुकीचे सुवर्णमार्ग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोने हे गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानले जाते. भारतात सोने हे गुंतवणुकीचे पारंपरिक साधन आहे. त्यामुळे दागिने, लगड, वेढे, चीप, नाणी व सोन्याची बिस्किटे अशा विविध स्वरूपात सोने खरेदीकडे भारतीयांचा कल असतो. सोन्यातील गुंतवणुकीला भारतीय महिलांचे प्राधान्य असते. एक विश्वासार्ह साधन म्हणून भारतात सोन्याकडे पाहिले जाते. मात्र, अलीकडील काळात सोन्याच्या किमतीत खूप मोठ्या प्रमाणात चढ-उतार होताना दिसतात. गेल्या काही महिन्यांपासून सोन्याची चमक थोडी फिकी पडली आहे. सोन्यात गुंतवणूक करताना नेमके काय लक्षात घ्यावे ? सोन्याच्या किमतीवर कोणते घटक परिणाम करतात? याविषयी..

सोने गुंतवणुकीमागील कारणे
सोन्यात गुंतवणुकीची दोन प्रमुख कारणे आहेत. एक सोने महागाई दराच्या परिणामापासून वाचवते. सोन्यातील दीर्घकालीन गुंतवणूक महागाईचा परिणाम कमी करण्यात उपयोगी ठरते. दुसरे कारण म्हणजे सोन्याची चाल शेअर बाजाराच्या अगदी विरुद्ध असते. म्हणजे शेअर बाजारात घसरणीचा कल असेल तर सोन्याच्या किमतीत तेजीचे संकेत असतात. त्यामुळे हुशार गुंतवणूकदार आपल्या पोर्टफोलिओमध्ये ८ ते १० टक्के वाटा सोन्याला देतात.

याशिवाय सोने संकटकाळात गुंतवणूकदाराला सावरण्यात उपयोगी पडते. तसेच सोन्यातील गुंतवणूक करणे सोपे आहे. त्यामुळे देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याला सातत्याने मागणी असते. काही देशांत राखीव सुवर्णसाठा असतो. एखादे राजकीय संकट किंवा आर्थिक संकट आले तर अशा वेळी सोन्याचे नगदीत रूपांतर करता येते. याशिवाय सोने तारण ठेवून कर्ज घेता येते.

सोन्याच्या किमतीवर परिणाम करणारे घटक
सोन्याच्या किमती बऱ्याच घटकांवर अवलंबून असतात. भारतात सोने मोठ्या प्रमाणात आयात केले जाते. त्यामुळे सोने खरेदी करताना गुंतवणूकदारांनी काही घटक लक्षात घेतल्यास सोने खरेदी फायद्याची ठरू शकते. ते घटक असे -
जागतिक घडामोडी
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा सोन्याच्या किमतीवर परिणाम होतो. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात दोन देशांत तणाव वाढल्यास सोन्याच्या किमती वाढतात.
नैसर्गिक आपत्ती
जगात कोठेही सुनामी, भूकंप, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्ती आल्या व त्यामुळे मोठे नुकसान झाल्यास सोन्याच्या किमती वर-खाली होतात.
रुपयाचे अवमूल्यन
विदेशी चलनाच्या तुलनेत रुपयात लक्षणीय घसरण झाल्यास सोन्यात तेजी येते. डॉलरच्या तुलनेत सध्या रुपया ६५.६९ या पातळीत आहे.
कच्चे तेल
कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यास सोने वधारते. सध्या कच्चे तेल पिंपामागे ४५ ते ५० डॉलरच्या पातळीत आहे. हे दर ८० डॉलरच्या वर गेल्यास सोने महागते.
अमेरिकेचे धोरण
समजा अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पॅकेज घोषित केले की शेअर बाजारात तेजी येते. मग लोक सोन्यातील पैसा बाजाराकडे वळवतात आणि सोने घसरते.
मुहूर्त, लग्नसराई
लग्नसराई व दसरा, पाडवा, अक्षय्य तृतीया यासारख्या मुहूर्तांच्या दिवशी सोन्याला मोठी मागणी असते. परिणामी किमती वाढतात.

भारत आणि सोने
जगभरातील सर्वच देशांत सोन्याला मागणी असते. मात्र भारतात सोन्याला जास्त मागणी आहे. देशातील ही मागणी पूर्ण करण्यासाठी सोने आयात
केले जाते.

त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने घसरल्यास त्याचा परिणाम भारतातील सोन्याच्या किमतीवर दिसून येतो. देशातील लग्नसराईच्या काळात सोन्याला जास्त मागणी असते.

एकूण मागणीच्या ८०%
सोने लग्न समारंभानिमित्त असते. तील बहुतांश सोने दागिन्यांसाठी वापरले जाते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोने किमतीचा इतिहास