आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्यावर व्याज देणारी ठेव योजना; या सुधारणा अभिप्रेत...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चांदीला अर्थप्रवाहात आणा ही डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून अनेक ठिकाणी वस्तूरूपात पडली सरकारने याचाही विचार करावा.

सोन्याच्या या योजनेत गुणदोष हे असणारच त्यावर यापूर्वीही दोन लेखांतून चर्चा झालेली आहे. लोकांचे समज -गैरसमज व मानसिकता याबद्दल आपण पाहिले आहे. दुसरे असे की सोन्यासारखेच चांदीलाही आपल्या येथे महत्त्व आहे. फार मोठ्या प्रमाणावर चांदी ही डेड इन्व्हेस्टमेंट म्हणून अनेक ठिकाणी पडली आहे. चांदीचे दरवाजे, चांदीचे चौरंग तसेच मोठमोठे खांब चांदीचे करून ठेवलेले अनेक ठिकाणी आढळते, याकडे सरकारने लक्ष द्यावयास पाहिजे. चांदीची भांडी, चांदीच्या मूर्तींबाबतसुद्धा विचार केला पाहिजे. चांदी भारतात मोठ्या प्रमाणात बनत नाही तसेच चांदीचे औद्योगिक क्षेत्रातही बराच वापर असतो. या सर्वांचा सखोल विचार करून चांदीलाही अर्थप्रवाहात कसे आणता येईल, यावर विचार करण्याची आवश्यकता आहे.

- आयकर-संपत्तीकर व कॅपिटल गेन मुक्त सवलतीचा दुरुपयोग नको, लक्ष हवे :
सोन्यावर मिळणारे व्याज हे आयकरमुक्त आहे. तसेच संपत्तीकर व कॅपिटल गेनपासूनही यातील व्यवहार मुक्त ठेवण्यात आले आहेत. ही बाब निश्चितच सोने गुंतवणूकदारांसाठी आकर्षक अशी राहणार आहे. यामध्ये या सवलतीचा दुरुपयोग होणार नाही याची काळजी ग्यावी लागणार आहे. अर्थात, एखाद्याला मिळालेले व्याज याच योजनेतून मिळाले हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्याचीच आहे, पण सरकारी मशिनरी अतिशय तोडकी असल्याने ही बाब तपासणी जाणे व याचा दुरुपयोग होणार नाही हे पाहावे.(समाप्त)

१ लाख; घडणावळ ५ हजार
सोने बँकेत देताना दागिन्यांच्या स्वरूपात असणार व बँकेतून हे सोन्याचे डिपॉझिट वापस घेताना सोने हे प्रायमरी स्वरूपातील सोने मिळणार म्हणजे त्या व्यक्तीस या कांबी किंवा दागिन्यांच्या स्वरूपातील दागिने पुन्हा करावयाचे असल्यास त्यासाठी लागणारी घडाई ही फार लागणार आहे. म्हणजेच सोने डिपॉझिट करून त्याने मिळविलेल्या व्याजाएवढीच रक्कम बहुदा या बँकेतून काढलेल्या सोन्याचे पुन्हा दागिने करण्यासाठी जी घडवणूक लागेल त्यासाठी व्याजाचा दर आकर्षक असला पाहिजे. समजा एखाद्याने ३० ग्रॅम सोने अंदाजे १ लाख रुपयाचे बँकेत डिपॉझिट म्हणून ठेवले व काही वर्षांनी त्याला व्याजासह बँकेतून १ लाख १० हजार मिळाले. आता या ३० ग्रॅमचे जर दागिने पुन्हा करावयाचे असतील, तर त्यासाठी अंदाजे ५ हजार रुपये घडणावळ लागेल. म्हणजेच त्या व्यक्तीचा असा फारसा कोणताच फायदा झाला नाही. याचाही विचार करावयास पाहिजे. सरकारच्या एकंदर आर्थिक धोरणाचा जो होरा आहे, तो असा की जनतेजवळ रोख पैसे फारसे असता कामा नये तसेच सोने पडून राहू नये. त्याचा अर्थकारणासाठी उपयोग व्हावा यासाठी ही योजना आहे.
- लेखक हे राज्य सरकारच्या विक्रीकर सल्लागार समितीचे माजा सदस्य असून त्यांनी विक्रीकर या विषयात पीएचडी केली आहे
बातम्या आणखी आहेत...