आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोने आठवडाभरातील खालच्या पातळीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - जागतिक बाजारातील नरमी आणि देशांतर्गत बाजारात मागणी कमी झाल्यामुळे बुधवारी दिल्ली सराफा बाजारामध्ये सोन्याचे भाव आठवडाभरातील खालच्या पातळीवर आले. दिल्ली सराफा बाजारात सोने २६,५४० रुपये प्रति तोळ्याने विक्री झाले. औद्योगिक मागणी कमी झाल्यामुळे चांदीच्या किमतीदेखील कमी झाल्या. चांदी ६५५ रुपयांनी पडून आठवड्याच्या नीचांकी पातळीवर ३५,१७५ रुपये प्रति किलोग्रॅमवर आली आहे. कॉमॅक्सवर सोने ११२६ डॉलर प्रति तोळ्यावर व्यवहार करत आहे.

अमेरिकेत या वर्षी व्याजदरात वाढ होण्याची शक्यता अजूनही व्यक्त करण्यात येत असल्यामुळेच सोन्यावर दबाव येत आहे. इतर देशांच्या प्रमुख चलनांच्या तुलनेत ड\\लर तीन आठवड्यांच्या सर्वोच्च पातळीवर गेल्यामुळेदेखील सोन्याच्या किमती कमी होत आहेत.