आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांदूळ निर्यातीत पाच दशलक्ष टनांनी घट, गोठलेल्या उत्पादनाचा फटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लागवडीखाली येणाऱ्या क्षेत्राला मर्यादा तसेच काहीसे गोठलेले उत्पादन याचा तांदळाच्या उत्पादनावर परिणाम झाला असून तांदळाची निर्यात २०२० पर्यंत पाच ते सहा दशलक्ष टनांनी कमी होण्याचा अंदाज ‘राबो बँके'ने आपल्या एका अहवालात व्यक्त केला आहे. सध्या तांदळाची निर्यात १० दशलक्ष टन आहे.

चांगल्या प्रतीचे उत्पादन खरेदी करण्याची ग्राहकांची बदललेली मानसिकता तसेच किरकोळ व्यवसायाला मिळत असलेला आधुनिक चेहरा यामुळे भविष्यकाळात ब्रँडेड तांदळाच्या बाजारपेठेत चांगली वाढ होण्याचा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
महसुलाबाबत निर्यातीमधून अतिरिक्त नफा मिळत असल्याने कंपन्यांनी आपल्या व्यवसायात वाढ करण्यासाठी स्थानिक ब्रँडेड व्यवसायावर लक्ष केंद्रित केले आहे. ब्रँडेड तांदळाकडे वळल्यामुळे या कंपन्यांच्या नफ्यातही फरक पडला असल्याकडे अहवालात लक्ष वेधण्यात आले आहे.

याअगोदर ग्राहक तांदळाला फार कमी महत्त्व देत असले, तरी आता मात्र त्यांचे प्राधान्य बदलत आहे. चांगल्या दर्जाच्या उत्पादनाबरोबरच पॅकेजिंग, रंग, धान्याचा आकार, सुगंध या दृष्टीनेदेखील कंपन्या अधिक जागरूक झाल्या असल्याचे राबो बँकेच्या अन्न आणि कृषी व्यवसाय विभागाचे मुख्य विश्लेषक शिवा मुदगिल यांनी सांगितले.

मॉडर्न रिटेलमध्ये २०१७ पर्यंत ब्रँडेड तांदळाचा वाटा हा सध्याच्या २० टक्क्यांवरून २५ टक्क्यांवर जाण्याचा अंदाजही राबो बॅँकेच्या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.