आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्नॅपडील काढणार 600 कर्मचारी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -ई-कॉमर्स कंपन्यांवर व्यापारातील तोट्याचा परिणाम दिसून येत आहे. पुढील काही दिवसांत स्नॅपडील ६०० कर्मचारी काढणार आहे. कर्मचारी कपात “वल्कन’ आणि डिजिटल व्यवहार संस्था “फ्रीचार्ज’मध्येदेखील होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कंपनीमध्ये एकूण ८००० कर्मचारी आहेत.
 
येत्या दोन वर्षांत नफा येण्यास सुरुवात झाली पाहिजे, असे उद्दिष्ट कंपनीच्या वतीने निश्चित करण्यात आले असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. असे झाल्यास ही नफा मिळवणारी देशातील पहिली ई-कॉमर्स कंपनी ठरेल. महत्त्वाचे म्हणजे भारतात फ्लिपकार्ट आणि अॅमेझॉनदेखील तोट्यात आहेत. त्यामुळे या तिन्ही कंपन्या खर्च कमी करत आहे.
बातम्या आणखी आहेत...