आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पेक्ट्रम दर ६० टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मे-जूनमध्ये होणाऱ्या स्पेक्ट्रम लिलावाच्या दरात ६० टक्क्यांची वाढ करण्याची शिफारस ट्रायच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच ७०० मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी ११,४८५ कोटी रुपये प्रति मेगाहर्ट्झची शिफारसदेखील करण्यात आली आहे. यात पहिल्यांदाच बँडचा लिलाव होणार आहे. मोबाइल फोनसाठी या फ्रिक्वेन्सीला सर्वोत्कृष्ट मानले जाते. मार्च २०१५ मध्ये या आधी झालेल्या लिलावात ९०० मेगाहर्ट्झ बँडसाठी ३,९८० कोटी रुपये दर ठेवण्यात आले होते. या जास्तीच्या किमतीमुळे पुढील काळात कॉल अाणि डाटा दोन्ही महागण्याची शक्यता आहे.
७०० मेगाहर्ट््झ बँडमध्ये मोबाइल सेवेवरील खर्च २१०० मेगाहर्ट््झच्या तुलनेत ७० टक्के कमी होतो. भारती एअरटेल, आयडिया, रिलायन्स जिओ यांच्यासह अनेक कंपन्यांनी ७०० मेगाहर्ट््झ बँडचा लिलाव न करण्याची मागणी केली होती. या फ्रिक्वेन्सी बँडसाठी त्यांची तयारी नसल्याचे मत या कंपन्यांनी व्यक्त केले होते. त्यामुळे स्पेक्ट्रमची खरेदी केल्यानंतर अनेक वर्षांपर्यंत त्यांचा पैसा अडकून पडणार आहे. ट्रायच्या वतीने ८०० मेगाहर्ट््झ बँडसाठी २२ टेलिकॉम क्षेत्रांपैकी १९ क्षेत्रांत लिलाव करण्याची शिफारस केली आहे.