आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकिंग स्टॉक्स विक्रीमुळे तेजीला ब्रेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - आठवड्यातील व्यवहाराच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात बँकिंग स्टॉक्समध्ये सर्वाधिक विक्री नोंदवण्यात आली. त्यामुळे बाजारात किरकोळ वाढ दिसून आली. ३० शेअरचा समावेश असलेला मुंबई शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स ३३.८३ अंकांच्या वाढीसह २६,३५०.१७ अंकांच्या पातळीवर बंद झाला, तर ५० शेअरचा समावेश असलेला राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रमुख निर्देशांक निफ्टी १२.६० अंकांच्या वाढीसह ८१२६.९० अंकाच्या पातळीवर बंद झाला. सोमवारी झालेल्या दिवसभराच्या व्यवहारात चढ-उतार दिसून आला.
बँकिंग स्टॉक्समध्ये झालेल्या विक्रीचा बाजारावर सर्वाधिक परिणाम झाला. बँकिंग निर्देशांकात मोठ्या प्रमाणात विक्री नोंदवण्यात आली, तर ऑटो, एफएमसीजी, मीडिया, मेटल, रिअॅल्टी निर्देशांकात चांगली खरेदी दिसून आली. निफ्टी ५० मध्ये सर्वात जास्त तेजी भारती एअरटेलच्या स्टॉक्समध्ये नोंदवण्यात आली. पेमेंट बँकेच्या बातमीमुळे बँकेला फायदा झाला. भारती एअरटेलचा स्टॉक्स ६.७१ टक्क्यांनी वाढून ३२१.२० रुपयांवर बंद झाला. याव्यतिरिक्त टाटा पॉवरमध्ये ३.८५ टक्के, झी लिमिटेडमध्ये ३.७५ टक्के, आयडियामध्ये ३.७३ टक्के आणि अदानी पोर्ट्समध्‍ये ३.१५ टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना सीआरआर१०० टक्क्यांच्या बरोबरीत ठेवण्याचे सांगितले आहे. यामुळे बँकांवर दबाव दिसून येत आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे व्यवहारातून ३.२४ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त लिक्विडिटी बाहेर निघून जाईल. यादरम्यान बँकिंग स्टॉक्स आणि बाँडवर दबाव दिसण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...