आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मॉल्स, सिनेमागृहे २४ तास सुरू राहणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- शॉपिंग मॉल्स, सिनेमागृहे आणि इतर तत्सम व्यवसाय २४ तास सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत परवानगी दिली आहे. या संदर्भात तयार करण्यात आलेल्या कायद्याला (मॉडेल शॉप्स अॅण्ड एस्टॅब्लिशमेंट बिल, २०१६) बुधवारी मंजुरी मिळाली. १० पेक्षा जास्त कर्मचारी असणाऱ्या व्यावसायिक प्रतिष्ठानासाठीच हा नियम लागू असणार आहे. तसेच उत्पादन क्षेत्रातील संस्था किंवा व्यवसायाला हा नियम लागू नसणार आहे.

यामध्ये महिलांना रात्रपाळीत काम करण्याची परवानगी देखील देण्यात आली आहे. मात्र, त्यासाठी आधी सुरक्षिततेसंदर्भातील सर्व निकष पूर्ण करावे लागणार आहेत. या व्यतिरिक्त अनेक ठिकाणांवर पिण्याचे पाणी, कँटीनची सुविधा, प्रथमोपचारसारख्या सुविधा देण्याविषयीचा उल्लेखही या कायद्यात करण्यात आला आहे.

दहा किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या आस्थापनांना वर्षातील ३६५ दिवस कामकाज करण्याची आणि अशा आस्थापना कधीही उघडण्याची अथवा बंद करण्याचे स्वातंत्र्य या कायद्यामुळे मिळाले आहे. मात्र उत्पादन व्यावसायिकांच्या युनिट्सना हा कायदा लागू असणार नाही. या कायद्याला संसदेची मंजुरी घेण्याची आवश्यकता असणार नाही. दुकाने आणि आस्थापनांना वर्षभर प्रदीर्घकाळ उघडे ठेवण्याची परवानगी दिल्यामुळे त्यांना जास्तीचे मनुष्यबळ लागेल. परिणामी रोजगारनिर्मिती होईल, असा सरकारचा हेतू आहे. राज्य सरकारे गरजेनुसार दुरुस्ती करून हा कायदा स्वीकारू शकतात, असे कामगार मंत्रालयाने दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे.

समान वातावरण
माहितीतंत्रज्ञान आणि जैवतंत्रज्ञान यासारख्या अत्यंत कौशल्याचे मनुष्यबळ लागणाऱ्या कामगारांना दिवसाचे तास आणि आठवड्याचे ४८ तासांतून या कायद्याने सूट दिली आहे. कायदेशीर तरतुदींमध्ये एकवाक्यता आणण्यासाठी आणि देशभरात समान कामकाजाचे वातावरण निर्माण करण्यासाठी राज्य सरकारांनाही हा कायदा स्वीकारता यावा, अशी त्याची रचना करण्यात आली आहे.
बातम्या आणखी आहेत...