आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदी: या 6 लोकांना सर्वात आधी येईल इनकम टॅक्सची नोटिस; बघा, यात तुम्ही तर नाही ना?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नोटाबंदीच्या निर्णयानंतर बँकिंग क्षेत्रात सकारात्मक परिणाम दिसत आहेत. लोक मोठ्याप्रमाणात बॅंकांमध्ये पैसा जमा करत आहेत. विशेष म्हणजे पंतप्रधान जनधन योजनेंतर्गत उघडण्यात आलेल्या खात्यात मागील 15 दिवसांत तब्बल 21 हजार कोटी रूपये जमा झाले आहेत. जनधन खात्यात एवढी मोठी रक्कम जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यात पश्चिम बंगाल आणि कर्नाटक राज्य आघाडीवर आहेत. या राज्यांमध्ये जनधन खात्यात सर्वाधिक रक्कम जमा झाली आहे.

दुसरीकडे, बँकेत जमा झालेल्या रकमेवर सरकार आणि प्राप्तीकर विभाग (इनकम टॅक्स डिपार्टमेंंट) नजर ठेवून आहे. सरकारने निर्धारित करून दिलेल्या मर्यादेत तुम्ही बँकेत रुपये जमा केले, म्हणजे तुम्हाला इनकम टॅक्सची नोटिस येणार नाही, असे समजू नका. इनकम टॅक्स डिपार्टमेंट बॅंकेत झालेल्या प्रत्येक व्यवहारावर तुम्हाला नोटिस पाठवू शकते.

आज आम्ही आपल्यासोबत 6 महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करणार आहोत. हे मुद्देे तुमच्याशी संंबंंधित असतील तर तुम्हाला इनकम टॅक्सची नोटिस येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
जाणून घ्या... काय आहेत सरकारचे नियम?
देशातील सर्व बँकांत जमा होणार्‍या रकमेचा तपाशील सरकारने मागितला आहे. बॅंकांमध्ये 30 डिसेंबरपर्यंत बचत खात्यात 2.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त आणि चालू खातात 12.5 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करणार्‍यांवर सरकार आणि इनकम टॅक्स डिपार्टमेंट नजर ठेवून आहे. दिवसभरात बॅंकेत 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा करणार्‍यांना पॅन कार्डची माहिती देणे बंधनकारक आहे. याचा अर्थ असा नाही की, पॅन कार्डची माहिती घेतली म्हणून इनकम टॅक्स डिपार्टमेंट प्रत्येकांची चौकशी करेल.

पुढील स्लाइडवर वाचा, या 6 मुद्द्यांवर इनकम टॅक्स डिपार्टमेंट तुम्हाला पाठवू शकते नोटिस...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...