आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयात वाढल्याने घाऊक कांदा स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सणासुदीच्या दिवसांत सर्वसामान्यांना रडवणारा कांदा आता स्वस्त झाला आहे. बाजारात कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यामुळे बाजार समितीत गेल्या आठवड्यात ५८ रुपये प्रतिकिलोने विक्री होणारा कांदा ३९ रुपये प्रतिकिलोवर आला आहे. यामुळे किरकोळ बाजारातदेखील कांद्याचे भाव हळूहळू कमी होत आहेत.

याविषयी एचएचआरडीएफने सादर केलेल्या अहवालात आंध्र प्रदेश, कुरनूर, तेलंगण, महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर आणि सातारा बाजार समितीमध्ये नव्या कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली आहे. आवक वाढल्यामुळे गेल्या महिनाभरात दिल्ली बाजारात कांद्याचे भाव ११ टक्के, तर लासलगाव बाजारात ३२ टक्क्यांनी कमी झाले आहेत. विदेशातून ८८८ मेट्रिक टन कांदा चेन्नई बंदरावर आला आहे.