आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

घर खरेदी करण्यासाठी पेन्शन फंड तारणाचा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कर्मचार्‍यांना आपल्या पेन्शन फंडाचा काही भाग तारण ठेवून परवडणारी घरे खरेदी करता यावीत, असा प्रस्ताव आहे. या प्रस्तावावर भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या १६ सप्टेंबरला हाेणार्‍या बैठकीमध्ये निर्णयाची शक्यता आहे.

भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सदस्यांना घर खरेदी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत एक तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने दिलेल्या अहवालावर भविष्य निर्वाह निधी, केंद्रीय विश्वस्त मंडळ या बैठकीत निर्णय घेण्याचा अंदाज आहे. कर्मचार्‍यांना त्यांच्या जमा झालेल्या पेन्शन फंडातून घर खरेदी करण्यासाठी आगाऊ रक्कम मिळेल आणि भविष्यातील पेन्शन फंडाची रक्कम ही किमान मासिक हप्ता भरण्यासाठी तारण म्हणून ठेवता येऊ शकेल, असा या घर याेजनेचा प्रस्ताव आहे. कर्मचार्‍यांना घर खरेदीची सुविधा देण्यासाठी समितीने एकमुखाने या योजनेची शिफारस केली आहे. या प्रस्तावित याेजनेत किमान मासिक हप्ता भरण्यासाठी भविष्यातील पेन्शन फंडाची रक्कम तारण ठेवताना कर्मचारी सदस्य, बँक आणि भविष्य निर्वाह निधी संघटना असा तिहेरी करार करण्यात येईल. या योजनेत कर्मचारी सदस्याला बँक िकंवा गृह वित्त कंपनीकडून कर्ज घेऊन घर खरेदी करता येऊ शकेल.