आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पीएफतून टीडीएस कपात; कामगार संघटनांचा विराेध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्राॅव्हिडंट फंडातील रक्कम परिपक्वता कालावधी किंवा मुदतपूर्व काढून घेतल्यास उगम स्थानी कर कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, मात्र, कामगार संघटनांनी या निर्णयाला विराेध केला असून या बाबत कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या ‘टीडीएस’ कापण्याच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी संघटनांनी केली आहे.

प्राॅव्हिडंट फंडात ३० हजारांपेक्षा जास्त रक्कम असेल आणि कर्मचार्‍याने पाच वर्षांपेक्षा कमी कालावधीत काम केले असेल, तर मुदतपूर्व रक्कम काढून घेतल्यास एक जूनपासून मूळ स्रोतातून कर कपात करण्यात येईल, असे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या एका अध्यादेशात म्हटले आहे. आॅल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे सचिव डी. एल. सचदेव यांनी सांगितले की, पीएफ रक्कम काढून घेताना मूळ स्रोतातून कर कपात करण्याच्या सरकारच्या निर्णयाला विराेध करणार आहे. या अध्यादेशाला स्थगिती देण्याबाबत कामगारमंत्र्यांना लेखी निवेदन देण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.

टीडीएस कापण्याच्या हालचालींना याअगाेदरही आम्ही विराेध केला हाेता. दाेन लाख रुपयांपेक्षा कमी रक्कम जमा असलेल्या प्रकरणात सवलत देण्याचा भविष्य िनर्वाह िनधी संघटनेचा प्रस्ताव हाेता, परंतु मुळात पीएफची रक्कम काढल्यास त्यावर कर आकारणी नकाे, असे मत संघटनेचे ए. डी. नागपाल यांनी व्यक्त केले. गुंतवणूकदार आणि उद्याेगपतींना सरकारकडून अनेक सवलती देण्यात येतात, परंतु कामगारांवर मात्र अन्याय हाेत असल्याचे मत सेंटर आॅफ इंिडयन ट्रेड युनियन्सचे अध्यक्ष ए. के. पद्मनाभन यांनी व्यक्त केले आहे.

करपात्र उत्पन्न
सध्याच्या परिस्थितीत जर कर्मचार्‍याच्या िवद्यमान तसेच अगाेदरच्या कंपनीतील सेवा कालावधी पाच वर्षांपेक्षा कमी असल्यास पीएफ काढून घेण्यात येणारी रक्कम ही करपात्र उत्पन्न म्हणून समजली जाते. याअगाेदर कर्मचार्‍याची पाच वर्षांपेक्षा कमी नाेकरी झालेली असेल, तर पीएफ रक्कम काढण्यावर सूट देण्यात येत नव्हती, पण आता ती अध्यादेशात देण्यात आली असल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...