आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुलैपासून पीएफचे पैसे शेअर बाजारात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) आपल्या पीएफचा पैसा जुलैपासून शेअर बाजारात लावणार असल्याची घोषणा गुरुवारी करण्यात आली. चालू आर्थिक वर्षात कमीत कमी ५ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. ईपीएफओकडे जवळपास ६.५ लाख कोटी रुपयांचा निधी आहे. यात वर्षाकाठी १ लाख कोटी रुपयांची गंुतवणूक होत होती. याआधी ही गुंतवणूक जोखीम नसलेल्या उत्पादनात होत होती. मात्र, शेअर बाजारातील परतावा आणि कर्मचार्‍यांची जास्त व्याजदराची मागणी पाहता शेअर बाजाराचा मार्ग निवडण्यात आला आहे.

ईपीएफओ सुरुवातीला एक्स्चेंज ट्रेडेड फंडात गुंतवणूक करणार असल्याचे कामगार मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी सांगितले. जुलै महिन्यात १ टक्क्याने सुरुवात करून वर्षाअखेर त्यात ५ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक करण्यात येणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास येणार्‍या काळात यात १५ टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. आर्थिक सुधारणांच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे. २०१४ -१५ मध्ये ईपीएफओकडील पैसा ८०,००० कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून ईपीएफओच्या सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत मासिक वेतन सीमारेषा ६,५०० वरून १५,००० रुपये करण्यात आली होती. यामुळे चालू आर्थिक वर्षात ईपीएफओमधील जमा रक्कम एक लाख कोटी रुपयांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे.

माझा काय फायदा?
सरकारला चांगला परतावा मिळेल. छोट्याशा गुंतवणुकीने देखील त्यांना ९.२२ टक्के व्याज मिळत आहे. यामुळे सरकार कर्मचार्‍यांना त्यांच्या जमा असलेल्या पैशावर जास्त व्याज देऊ शकते. सध्या यावर ८.७५ टक्के व्याज मिळते.

पैसे बुडणार तर नाहीत?
बिलकुल नाही, हा पैसा सध्या सुरक्षित असलेल्या एक्स्चेंज ट्रेडेड फंडमध्ये लागणार आहे. ईटीएफमध्ये गुंतवणुकीसाठी बाहेरून निधी व्यवस्थापकांची भरती होणार नाही. कामगार मंत्रालय आणि ईपीएफओचे अधिकारीच याबाबत निर्णय घेतील आणि देखरेख करतील.
बातम्या आणखी आहेत...