आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Modi At IMF Summit: India Is A Ray Of Hope For Global Economic Recovery

देशात आर्थिक सुधारणा सुरूच राहतील : मोदी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- देशातील बँका आणि बाजार नियंत्रक संस्थांच्या व्यवहारात सरकारचा हस्तक्षेप आता इतिहासजमा झाला असून त्यामुळे भ्रष्टाचारासारखी प्रकरणे होणार नाहीत. तसेच देशातील आर्थिक विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. आंतराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) आणि भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सल्लागार आशिया परिषदेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

उद्योगपती विजय मल्ल्यांवर ९००० कोटी रुपयांचे कर्ज बुडवून विदेशात पळून गेल्याचा आराेप करण्यात येत असून अशा वेळी मोदी यांनी बँकांबाबत व्यक्त केलेल्या या टिप्पणीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. लोकशाही असलेल्या देशात वेगाने प्रगती होऊ शकत नसल्याचे अाजपर्यंत बोलले जात होते. मात्र, भारताने आपल्या कृतीतून हे खोटे असल्याचे सिद्ध केले आहे. भारतीय अर्थव्यवस्था जगभरातील इतर सर्व मोठ्या अर्थव्यवस्थेच्या तुलनेत वेगाने प्रगती करत असल्याचे माेदी यांनी सांगितले.

भारत सर्वात तेजीने विकसित होणारी अर्थव्यवस्था तर आहेच, त्याचबरोबर गुंतवणूकदारांसाठी सर्वात विश्वासार्ह ठिकाणांपैकी एक असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. आर्थिक सुधारणांच्या दिशेने देशातील प्रगती उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी सांगितले. सुधारणेच्या माध्यमातून परिवर्तन करण्याचा माझा प्रयत्न असून ते साध्य करणे अजून बाकी असल्याचे मोदी म्हणाले. सरकारच्या वतीने देशात अर्थविषय सुधारणा करण्यासाठी घेण्यात आलेल्या अनेक निर्णयांमुळेच देशातील उद्योगशिलता वाढत असल्याचा दावादेखील मोदी यांनी या वेळी केला.

आयएमएफमध्ये सुधारणा
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ)मध्येदेखील सुधारणा होत असून यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेला योग्य दिशा मिळत असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. या वेळी आयएमएफच्या एमडी क्रिस्टिन लेगार्ड, अर्थमंत्री अरुण जेटली यांची उपस्थिती होती.