आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंतप्रधानांनी केले तीन सूवर्ण योजनांचे उद्‍घाटन, सोन्याचे नाणे केले सादर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (गुरुवार) तीन सुवर्ण योजनांचे उद्‍घाटन केले.
सूवर्ण कमाई योजना (गोल्ड मोनेटायझेशन स्कीम), सोने सार्वभौम रोखे (गोल्ड सॉव्हरेन बाँड) गोल्ड बुलियन योजनेचा समावेश आहे. याशिवाय दिवाळीनिमित्त अशोक चक्र असलेले सोन्याचे नाणे देखील सादर करण्‍यात आले आहे. काही दिवसांपूर्वी या महत्त्वाकांक्षी योजनांची घोषणा करण्यात आली होती.

सोन्याची सर्वाधिक मागणी असलेला भारत हा एक प्रमुख देश आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी आपल्याला वर्षाकाठी 900 ते 1000 टन सोने आयात करावे लागत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले. देशातील घराघरांत, मंदिरांत आणि विविध संस्थांकडे सुमारे 20 ते 24 हजार टन सोने पडून आहे. लोकांकडे पडून असणाऱ्या सोन्याचा वापर अर्थव्यवस्थेसाठी करण्यासाठी सरकारने सूवर्ण योजना सादर केल्या आहेत. सुवर्ण बचत योजनेच्या माध्यमातून सोने आयातीवरील मोठा खर्च वाचेल, असे सरकारने अंदाज व्यक्त केला आहे.

अशोक चक्र असलेल्या नाण्याची निर्मिती भारतात...
भारत सरकारने पहिल्यांदा अशोक चक्र असलेले सोन्याचे नाणे सादर केले आहे. या नाण्याची निर्मित्ती भारतात होणार आहे. आतापर्यंत देशातील बॅंका फक्त स्विस एस्से सर्टिफाइड नाणे विकत होत्या. या नाण्याच्या दुसर्‍या बाजुला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा असेल. 5 ग्रॅम, 10 ग्रँम व 20 ग्रॅम वजनात ही नाणे उपलब्ध होणार आहेत. सुरुवातीला खनिज व धातु व्यापार निगम लिमिटेडतर्फे (एमएमटीसी) हे नाणे विक्रीसाठी बाजारात ठेवले जाईल. नंत बॅंका तसेच पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

अशा आहेत सूवर्ण योजना...
सोने कमाई योजनेत सोने जमा करण्यासाठी दागिने वितळावे लागणार आहेत. तसेच यावर मिळणारे व्याजही अत्यल्प आहे. त्यामुळे या सुवर्ण बचत योजनेला किती प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, सुवर्ण कमाई योजनेविषयी...