आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यावसायिकांचा ओढा 'ई-पेमेंट' सुविधेकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारताला कमी नगदी वापरणारी अर्थव्यवस्था बनवण्यात युवा व्यावसायिक मदत करू शकतात. युवा व्यावसायिक पैशाचा व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्यास तयार आहेत. नगदी पैसे घेण्यात सुरक्षेसह इतर अडचणीदेखील आहेत. मास्टर कार्डच्या एका अहवालात हे स्पष्ट करण्यात आले आहे. आरबीआय आणि बँका दरवर्षी चलन व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी सुमारे २१ हजार कोटी रुपये खर्च करतात.

मास्टर कार्डच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या या अहवालासाठी त्यांनी नऊ शहरातील १,६५३ व्यावसायिकांशी चर्चा केली आहे. यामध्ये दिल्ली, कोलकाता, मुंबई, चेन्नई, बंगळुरू, बरेली, रांची, नाशिक आणि विजयवाडा यांचा समावेश आहे. यातील निष्कर्षानुसार ३५ ते ४५ वयाचे व्यावसायिक इलेक्ट्रॉनिक पेमेंट सिस्टिमसाठी जास्त आग्रही आहेत.
बातम्या आणखी आहेत...