Home | Business | Personal Finance | purchasing power of consumer increased due to gst

जीएसटीमुळे ग्राहकांच्या क्रयशक्तीत वाढ, 80% पेक्षा जास्त वस्तू 18% पेक्षा कमी कराच्या अंतर्गत

वृत्तसंस्था | Update - Jul 02, 2017, 05:03 AM IST

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर ग्राहकांची खरेदी करण्याची शक्ती वाढली आहे.

 • purchasing power of consumer increased due to gst
  नवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) लागू झाल्यानंतर ग्राहकांची खरेदी करण्याची शक्ती वाढली आहे. जवळपास ८० टक्क्यांपेक्षा जास्त वस्तू या १८ टक्क्यांपेक्षा कमी कराच्या अंतर्गत आहेत.
  दुसरीकडे लघु आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये (एसएमई) असलेल्या तांत्रिक अडचणी दूर कराव्या लागतील. या नव्या करप्रणालीमध्ये सुरुवातीचे काही दिवस व्यापाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता असल्याचे मत करतज्ज्ञांनी मांडले आहे. या अर्थव्यवस्थेचा सर्वच क्षेत्राने स्वीकार करावा यासाठी सरकारनेही सहानुभूती दाखवावी. जीएसटी लागू झाल्यानंतर अबकारी, सेवा कर आणि व्हॅटसारखे अनेक कर संपुष्टात आले आहेत. पूर्ण देश एक बाजार बनला आहे. देशाच्या एका टोकापासून ते दुसऱ्या टोकापर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय सामानाची वाहतूक शक्य होणार आहे.
  केपीएमजी (इंडिया) चे पार्टनर आणि अप्रत्यक्ष कर विभागाचे प्रमुख सचिन मेनन यांनी सांगितले की, “८० टक्के वस्तू जीएसटीअंतर्गत १२ ते १८ टक्के कराच्या अंतर्गत ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या वस्तूंच्या किमती कमी होतील. यामुळे ग्राहकांच्या उत्पन्नात वाढ न होताही त्यांची खरेदी करण्याची शक्ती वाढेल. त्यामुळे मागणीत तेजी येईल.’ उद्योग क्षेत्रातील अनेक जण जीएसटी लागू झाल्याच्या पहिल्या दिवसापर्यंतही नव्या नियमांचे पालन करण्यास सक्षम झालेले नाहीत, असे मत बीएमआर अँड असोसिएट्स एलएलपी लीडरचे राजीव डिमरी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बदल करण्यासाठी त्यांना काही महिन्यांची सवलत देण्यात यायला हवी.

  मुंबईतील विक्रीकर भवन शनिवारी बनले जीएसटी भवन
  देशात नवीन कर प्रणाली लागू होताच महाराष्ट्र सरकारने आधीच्या विक्रीकर विभागाच्या मुख्यालयाचे विक्रीकर भवन हे नाव बदलून शनिवारी जीएसटी भवन केले. दक्षिण मुंबईच्या माझगावमध्ये हे भवन आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत हा नामांतर सोहळा झाला. जीएसटी गरिबांच्या सेवेसाठी असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

  पाच ऑगस्ट रोजी घेतला जाणार जीएसटी अंमलबजावणीचा आढावा
  नवी दिल्ली- जीएसटीच्या अंमलबजावणीचा पहिला आढावा जीएसटी परिषद ५ ऑगस्ट रोजी घेणार आहे. वस्तू व सेवा करांच्या बाबतीत सर्वाधिकार प्राप्त असलेली ही परिषद काही वस्तुंवरील जीएसटीच्या दराचेही पुनरावलोकन करणार आहे. ऑगस्टच्या पहिल्या शनिवारी होणाऱ्या या बैठकीत एखाद्या सदस्याने एखाद्या वस्तूच्या जीएसटी दरावर आक्षेप घेतला तर त्याचाही आढावा घेतला जाईल, असे सीबीईसीचे अध्यक्ष वनजा एन. शर्मा यांनी सांगितले.

Trending