आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Raghuram Rajan Warns Against Deep Discounting By Start Ups

‘स्टार्ट अप’साठी शिक्षण, आरोग्यावर भर द्या; रघुराम राजन यांचे मत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘स्टार्ट अप इंडिया’साठी शिक्षण आणि आरोग्य सुविधांसह पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिकाधिक भर देणे आवश्यक असल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी साेमवारी व्यक्त केले.

भारतीय लोकप्रशासन संस्था व यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानात ‘स्टार्टिंग अप इंडिया’ विषयावर राजन बोलत होते. या वेळी मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित हाेते.
राजन म्हणाले की, ‘रोजगारनिर्मिती हे भारतासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. नवीन उद्योगांच्या उभारणीतून मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होऊ शकते. नवीन उद्योग उभे करतानाच त्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण तयार करणे गरजेचे आहे. त्यासाठी पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्यांना शिक्षण आणि आरोग्य सुविधांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. कुपोषणासारखी गंभीर समस्या उत्तम मनुष्यबळ निर्मितीमधील अडसर आहे. तसेच मूलभूत शिक्षणाशिवाय कौशल्यविकास अशक्य आहे, म्हणून आरोग्य आणि शिक्षण सुविधांचा विकास अतिशय गरजेचा आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
....तर विकासदर वाढेल : क्षत्रिय
राज्यात टंचाईग्रस्त परिस्थिती असतानाही राज्याचा विकास दर ८ टक्के आहे. शासनाने जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेतली असून मान्सूनने चांगल्या प्रकारे साथ दिल्यास राज्याचा विकासदर दोन अंकी असेल, असे क्षत्रिय यांनी सांगितले.