आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आर्थि‍क महामंदीच्या दिशेने वाटचाल करत आहे जग; रघुराम राजन यांनी दिले संकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन- रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडि‍या (आरबीआय) गर्व्हनर रघुराम राजन यांनी जागतिक महामंदीचे संकेत दिले आहे. आर्थिक महामंदीचे वादळ घोंगावत असून ते जागतिक अर्थव्यवस्थेच्या दिशेने वाटचाल करत आहे. यापूर्वी 1930 मध्ये संपूर्ण जगाने आर्थिक महामंदीचा सामना केला होता.

आर्थिक महामंदी जगभरातील बलाढ्य राष्ट्रांसाठी डोकेदुखी ठरणार असल्याचेही मत राजन यांनी व्यक्त केले आहे. या पार्श्वभूमीवर जागतिक बॅंकांनी अर्थव्यवस्थेचे नवे नि‍यमावलीचे तंतोतंत पालन करण्याच्या सूचना राजन यांनी दिल्या आहेत. लंडन बिझनेस स्कूलमध्ये (एलबीएस) एका कार्यक्रमात राज बोलत होते.

लंडन बिझनेस स्कूलमध्ये (एलबीएस) एका कार्यक्रमात राज बोलत होते. महामंदीचे स्वरुप कसे असेल, याचा अंदाज लावणे सध्या शक्य नाही. परंतु, यावर विस्तुत संशोधन होऊन त्यावर उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. तसेच आगामी काळात आंतरराष्ट्रीय चर्चा घडवून यावी, अशी अपेक्षा राजन यांनी व्यक्त केली आहे. महामंदी ही फक्त औद्योगिकदृष्या विकसित देशांचीच नव्हे, तर विकसनशिल देशांची समस्या आहे. थोडक्यात सांगायचे तर ही संपूर्ण जगाची समस्या असल्याचे राजन यांनी यावेळी सांगितले.
जागतिक बँकांकडून देण्यात येत असलेल्या स्पर्धात्मक चलन धोरणातील सुटीविषयीही राजन यांनी चिंता व्यक्त केली आहे. भारतातील स्‍थि‍ती थोडी वेगळी आहे. आरबीआय फक्त आणि फक्त गुंतवणूक वाढवण्यावर भर देत आहे. मागील वर्षभरापासून देशात गुंतवणुकीच्या आशा वाढल्या आहेत. थांबलेल्या प्रकल्पांची संख्यादेखील कमी झाली आहे. यामुळे गुंतवणुकीबाबत सकारात्मकता वाढलेली दिसत आहे.
सर्व राष्‍ट्रांना एकत्र येऊन करावे लागतील नवे नियम
भविष्यात ओढवणार्‍या जागतिक महामंदीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्‍यासाठी जगातील सर्व राष्‍ट्रांना एकत्र यावे लागणार आहे. जागतिक बॅंकेच्या वाटचालीनुसार आर्थिक नियमांवर विचारविनिमय व्हायला हवेत.