आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नोटबंदीला रतन टाटांचा पाठींबा, म्हणाले - आतापर्यंतच्या तीन मोठ्या इकॉनॉमिक रिफॉर्म्सपैकी एक...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्लीः ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद करण्याच्या निर्णयाला रतन टाटा यांनी पाठिंबा दिला आहे. त्यांनी नोटबंदीला तीन महत्त्वाच्या इकॉनॉमिक रिफॉर्म पैकी एक सांगितले आहे. टाटा यांनी जनतेला या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी अपिल केले आहे. ते म्हणाले की, सरकारच्या या निर्णयाला यशस्वी बनवण्यासाठी संपूर्ण देशाच्या पाठिंब्याची गरज आहे. टाटांनी केले अनेक ट्वीट

- रतन टाटा यांनी काळ्यापैशाला नष्ट करण्यासाठी उचलण्यात आलेल्या या निर्णयाचे कौतुक केले आहे. या निर्णयाच्या समर्थनार्थ त्यांनी अनेक ट्वीट केले.
- या ट्वीटमधून ते म्हणाले की, काळ्यापैशाच्या अर्थव्यवस्थेमुळे देशामध्ये टॅक्स चोरी, मनी लॉन्ड्रींग आणि भ्रष्टाचार यांना प्रोत्साहन मिळाले आहे. त्यांनी दावा केला आहे की, जीएसटी आणि डिलाईसेंसिंगनंतर नोटबंदी आतापर्यंतचा तिसरा महत्त्वाचा इकॉनॉमिक रिफॉर्म आहे.
- टाटा यांनी नरेंद्र मोदी यांच्या या निर्णयाला धाडसी म्हटले आहे. तसेच आपण सर्वांनी त्यांना पाठींबा दिला पाहिजे असेही ते म्हणाले.

कॅशलेस ट्रांझॅक्शनला सांगितले फायद्याचे...
- टाटा यांनी मोदी सरकारच्या कॅशलेस ट्रांझॅक्शनच्या निर्णयाचेही कौतुक केले आहे. टाटा म्हणाले की, ई-ट्रांझॅक्शनमुळे पुढील काळात सामान्य तसेच वंचित वर्गालाही खुप फायदा मिळेल.
- यापूर्वी गुरूवारी त्यांनी नोटबंदीमुळे लोकांना होणाऱ्या त्रासावर चिंता व्यक्त केली होती. टाटा यांनी ट्वीट केले होते की, या निर्णयामुळे लोकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषकरून मेडिकल एमरजन्सीदरम्यान अनेक अडचणी येत आहेत.

सरकारला मजबूत नियोजन करण्याचा दिला सल्ला
- टाटा यांनी नव्या नोटा पुरवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना चांगले प्रयत्न म्हटले आहे. सोबतच त्यांनी काही विशेष उपाययोजना कराव्यात असेही सांगितले.
-टाटा सन्सचे अंतरिम चेअरमनने सल्ला देताना सांगितले की, ज्या प्रकारे नैसर्गिक आपत्ती दरम्यान सरकार पिडीतांना मदत करते. तशाच प्रकारे नोटबंदीवेळी गरिबांची मदत करायला हवी. यामुळे गरीबांमध्ये सरकार त्यांच्याकडे विशेष लक्ष देत आहे अशी भावना निर्माण होईल.
बातम्या आणखी आहेत...