मुंबई - भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) रेपो रेट दरात पाव टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे गृहकर्ज आणि वाहन कर्ज धारकांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी द्विमासिक पडताळणीत रेपो रेट 7.50 टक्क्यावरुन 0.25 टक्क्याने कपात करत 7.25 केला आहे. जानेवारीपासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये कपात करण्याची ही तिसरी वेळ आहे. तर आरबीआयने सीआरआर 4 टक्क्यांवर कायम ठेवला आहे. आरबीआयच्या या निर्णयाचे उद्योगजगताकडून स्वागत होण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांचे मत आहे, की गुंतवणूक वाढवण्यासाठी आगामी काळात रेपो दरात आणखी कपात होण्याची शक्यता आहे.
याआधी दोन वेळा आश्चर्यकारक कपात
रिझर्व्ह बँकेने याआधी दोन वेळा सरप्राइज दरकापत केली होती. आरबीआय गव्हर्नर राजन यांनी 15 जानेवरी रोजी रेपो दरात 0.25 टक्के कपात केली होती. त्यानंतर 4 मार्चला पुन्हा एकदा 0.25 टक्के कपात केली गेली. जानेवारीपासूनची आतापर्यंतची ही तिसरी रेपो दरकापत आहे.
होम लोन | किती वर्षे | ईएमआय पहिले | ईएमआई आता | बचत (वार्षिक) |
25 लाख | 20 वर्ष | 25,541 रुपये | 24,126 रुपये | 4980 रुपये |
30 लाख | 20 वर्ष | 29,449 रुपये | 28,951 रुपये | 5976 रुपये |