आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाई सहा टक्क्यांपेक्षा कमी झाली तर व्याजदर कपात : राजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - व्याजदर कमी केल्यानंतरही जर महागाई सहा टक्क्यांच्या खाली येण्याचा विश्वास वाटला तरच व्याजदर कपात करण्यात येईल, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे. महागाईच्या चिंतेमुळेच मंगळवारी मासिक नाणेनिधी धोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेने व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला. परंतु आर्थिक आकडेवारी सकारात्मक झाल्यास २९ सप्टेंबरच्या अगोदर व्याजदर कमी होण्याचे संकेतही दिले. जानेवारी ते मार्च २०१६ या कालावधीत किरकोळ महागाई ६.१ टक्क्यांच्या आसपास राहील, अशी रिझर्व्ह बँकेची अपेक्षा आहे. प्रत्यक्षात महागाई त्यापेक्षा कमी असणे गरजे आहे. तसे झाल्यास व्याजदर कमी करण्यास कशी संधी मिळू शकते हे बघत आहोत, असे राजन यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना सांगितले.
बातम्या आणखी आहेत...