आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सायबर सिक्युरिटी: आरबीआय स्थापणार स्वतंत्र आयटी शाखा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली-भारतातील सायबर सिक्युरिटीला मजबूत बनवण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आयटी शाखा बनवण्यावर विचार करत आहे. बोर्डाच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाल्याची माहिती रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिली. या बैठकीत आयटी शाखा बनवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

जगातील इतर देशांप्रमाणे भारतातदेखील वेबसाइट हॅक होण्याची भीती असल्याचे राजन यांनी गोवा येथे झालेल्या रिझर्व्ह बँकेच्या बोर्ड बैठकीनंतर सांगितले आहे. सायबर क्राइमचा निपटारा करण्यासाठी आपल्याला आता तयारी करावी लागेल, तसेच इतर बँकांनादेखील आयटीचा अधिक वापर वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असेही राजन यांनी या वेळी सांगितले.

घटनात्मक बदलांवर चर्चा
रघुराम राजन यांनी सांगितले की, बैठकीत आर्थिक क्षेत्रातील सुधारणांसाठी घटनात्मक बदलांवर चर्चा झाली. याबाबतीत बोलण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करत आर्थिक क्षेत्रात असे बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक हा बदल करण्यासाठी सरकारने आधीच पुढाकार घेतला आहे.

सरकारसोबत मतभेद नाहीत : राजन
सेंट्रल बँकेसाठी स्वतंत्र सार्वजनिक कर्ज केंद्र (पीडीएमए) बनवण्याच्या विरोधात नसल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर राजन यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले. या बाबतीत सरकार आणि रिझर्व्ह बँकेत कोणतेच मतभेद नसल्याचे त्यांनी सांगितले. या आधीदेखील राजन यांनी या मुद्द्यावर पीडीएमए सरकार आणि सेंट्रल बँकेपासून स्वतंत्र हवे, ज्यामुळे आर्थिक शिस्त लागेल, असे म्हटले होते. लक्षणीय बाब म्हणजे, आर्थिक वर्ष २०१५-१६च्या अर्थसंकल्पात पीडीएमएचा प्रस्ताव होता. पैसा उभारणे, खर्च कमी करणे आणि जास्त कालावधीसाठी सार्वजनिक कर प्रणालीतील जोखीम स्तर कमी करणे हा यामागील उद्देश होता. केंद्र सरकारच्या निगराणीखाली काम करण्याचा प्रस्ताव अर्थसंकल्पात होता.

बँकांच्या एनपीएवर चिंता
रघुराम राजन यांनी बँकेच्या वाढत असलेल्या एनपीएवर चिंता व्यक्त केली. बँकांचा एनपीएवरील वसुलीचा वेग कमी असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याची स्थिती नेमकी कशी आहे, याबद्दल सांगता येणे शक्य नसले तरी याबाबत चिंता व्यक्त करण्याची स्थिती असल्याचे ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...