आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रघुराम राजन, अगोदर बँक कर्मचाऱ्यांना नोटांवर लिहिण्यापासून रोखा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भास्कर रिसर्च- तीन दिवसांपूर्वी आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी नोटेवर न लिहिण्याचे आवाहन केले आहे. आरबीआय गेल्या पंधरा वर्षांपासून असे प्रयत्न करत आली आहे. मात्र, नोटांवर स्वत: बँक कर्मचारी लिहितात. देशात नोटांबाबत नुकत्याच केलेल्या तीन बदलांची माहिती जाणून घ्या...

1.क्लीन करन्सी ठरली स्वप्नवत
आरबीआयने स्वच्छ चलन धोरण २००१ मध्ये प्रसिद्ध केले होते. लोकांनी नोटेवर लिहू नये आणि स्टेपल करून नये हा त्यामागचा उद्देश हाेता. सध्या ९५ टक्के नोटांवर पिना नाहीत. मात्र, नोटेवर लिहिण्याची सवय स्वत: बँक कर्मचाऱ्यांनाही सुटली नाही. रेल्वे आरक्षण, टपाल कार्यालय, एलआयसी कार्यालयांसारख्या ठिकाणांवरही कर्मचारी संख्या लक्षात ठेवण्यासाठी लिहितात.

73 अब्ज चलनावर मार्च २०१३ पर्यंत लिहिले किंवा स्टेपल केले होते. त्याचे एकूण मूल्य ११६० कोटी रुपये होती. २०१२ मध्ये १४ अब्ज बँक नोटा नष्ट केल्या होत्या.

नोटेच्या वॉटरमार्कच्या भागात लिहिल्यानंतर मशीन त्यास रिजेक्ट करते. वॉटरमार्क एक मुख्य सुरक्षात्मक फिचर आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, नोटा बदलून देण्यात बॅंक अपयशी...