आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

GST चा मोदींनाच बसला फटका, गमावले चक्क 12 हजार कोटी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जीएसटीसंदर्भात घेतलेला निर्णय मोदी सरकारला चांगलाच भारी पडला आहे. त्यामुळे सरकारला तब्बल १२ लाख कोटी रुपयांचा फटका बसला आहे. त्याचे झाले असे, की ऑक्टोबर महिन्यात जीएसटी कलेक्शन रेकॉर्ड लेव्हलला होते. ऑक्टोबर महिन्यात रेव्हेन्यू ८३,३४६ कोटी रुपये राहिले. या महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये रेव्हेन्यू ९२ हजार कोटी होते. जीएसटी लागू होण्याच्या ठिक पुढच्याच महिन्यात म्हणजेच जुलैमध्ये जीएसटीची कमाई ९५ हजार कोटी रुपये होती. म्हणजे जर जुलैचा बेस पकडून विचार केला तर सरकारला जीएसटी कलेक्शनमध्ये तब्बल १२ हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे.

 

आपलाच निर्णय पडला भारी
जीएसटी कलेक्शन कमी होण्याला सरकारचाच निर्णय कारणीभुत असल्याचे दिसून आले आहे. रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात जीएसटी रेट्स कमी करण्यात आले. त्यामुळे ही घट दिसून आली आहे. सरकारने एकूण २७५ प्रोडक्टपैकी केवळ ५० प्रोडक्ट टॉप कॅटेगरीत ठेवले आहेत. या कॅटेगरीचा दर २८ टक्के आहे. बाकी इतर सर्व प्रोडक्टच्या जीएसटी दरात कपात करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांमध्ये आणखी काही प्रोडक्ट जीएसटी कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

 

फायनान्स मिनिस्ट्रीने जाहीर केले आकडे
२७ नोव्हेंबरपर्यंत जीएसटीच्या रुपात ८३,३४६ कोटी रुपये रेव्हेन्यू मिळाला होता. हे ऑक्टोबर महिन्याचे कलेक्शन होते. यावेळी ५०.१ लाख व्यापाऱ्यांनी रिटर्न दाखल केले. ही माहिती फायनान्स मिनिस्ट्रीने जाहीर केली आहे.

 

पुढील स्लाईडवर बघा, कशी कमी झाली सरकारची कमाई....  

बातम्या आणखी आहेत...