आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वाचा, तुम्ही दिलेल्या 500-1000 च्या जुन्या नोटांचे काय होणार, अशी आहे पद्धत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- तुम्ही दिलेल्या जुन्या 500-1000 च्या नोटांपासून विटा, फाईल कव्हर आणि टी-कोस्टर तयार केले जाणार आहेत. 2300 कोटी जुन्या नोटा नष्ट केल्या जाणार आहेत असे आरबीआयने सांगितले आहे. सुमारे 13 वर्षांपूर्वी जुन्या नोटा नष्ट करण्याची पद्धत सुरु झाली होती. यासाठी देशभरात 19 सेंटर्स तयार करण्यात आले आहेत.
नोटांना रिसायकल करण्यासाठी आहेत 27 मॉडर्न मशिन
- 2003 मध्ये आरबीआयचे गव्हर्नर बिमल जालान यांच्या कार्यकाळात जुन्या-खराब नोटा नष्ट करण्याची सुरवात झाली.
- त्यासाठी करन्सी व्हेरिफिकेशन अॅण्ड प्रोसेसिंग सिस्टिम (सीव्हीपीएस) लागू करण्यात आले होते.
- त्या अंतर्गत देशभरातील 19 ठिकाणी नोटा नष्ट करण्याचे सेंटर्स तयार करण्यात आले.
- यातील कोणत्या सेंटरमध्ये एका तासात 60,000 जुन्या नोटा नष्ट करुन त्यापासून विटा बनवल्या जातात.
- जुन्या नोटा रिसायकल करुन नवीन नोटांचा कागद तयार करण्याची प्रक्रियाही येथेच केली जाते.
- यासाठी आरबीआयने या 19 सेंटर्सवर 27 मॉडर्न मशिन लावल्या आहेत.
अशा नष्ट करतात जुन्या नोटा
- या मशीनमध्ये जुन्या नोटा टाकल्या जातात. त्यांचे सुरवातीला बारीक तुकडे केले जातात.
- 2015-16 मध्ये देशभरातील 1,640 कोटी खराब नोटा नष्ट करण्यात आल्या.
- 2012-13 मध्ये देशभरातील 1,400 कोची नोटा नष्ट करण्यात आल्या होत्या.
पुढील स्लाईडवर वाचा... नोटा छापण्यात भारताचा दुसरा क्रमांक... जगभरात काय करतात जुन्या नोटांचे... बॅंकेत पोहोचल्या 6 लाख कोटी रुपयांच्या जुन्या नोटा...
बातम्या आणखी आहेत...