आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलायन्सचे कंपनीचे शेअर 9 वर्षाच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  -रिलायन्स जिओचे नव्या दरपत्रकाच्या घोषणेनंतर रिलायन्स उद्योग लिमिटेड (आरआयएल) च्या शेअरमध्ये १० टक्क्यांची तेजी नोंदवण्यात आली असून कंपनीचे शेअर ९ वर्षांच्या विक्रमी उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. गुंतवणूकदारांनी या कंपन्यांच्या शेअरची जोरदार खरेदी केली.
 
एक दिवस आधी कंपनीच्या “मार्केट कॅप’ मध्ये सुमारे ३८७३१ कोटी रुपयांची वाढ झाली होती. आरआयएलचे शेअर २००९ मध्ये या पातळीच्या वर होते.  
 
कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी मंगळवारी कंपनीचे दरपत्रक जाहीर केले होते. या आधी घोषणा करण्यात आलेल्या मोफत डाटा योजनेची मुदत ३१ मार्च २०१७ रोजी संपत आहे. एक एप्रिल २०१७ पासून आता नव्याने घोषणा केलेले दरपत्रक लागू होणार आहे. यामध्ये अंबानी यांनी दिलेल्या माहितीनुसार लोकल आणि एसटीडी कॉल फ्री असणार आहेत. मात्र, अमर्याद डाटा योजनेत सहभागी होण्यासाठी ग्राहकांना आधी ९९ रुपयांत प्राथमिक सदस्यता 
स्वीकारावी लागेल.  
 
बाजारात तेजी  
 भारतीय शेअर बाजारात बुधवारी झालेल्या व्यवहारात रिलायन्सच्या शेअरमध्ये झालेल्या जोरदार खरेदीमुळे बाजारात तेजी नोंदवण्यात आली आहे. मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स १०३ अंकाच्या वाढीसह २८८६४ या पातळीवर पोहोचला आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी १९ अंकाच्या वाढीसह ८९२६ या पातळीवर बंद झाला आहे.
बातम्या आणखी आहेत...