आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेपो दर जैसे थे, व्याजदरात कोणताही बदल नाही, सर्वसामान्यांची निराशा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- भारतीय रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर रघुराम राजन यांनी आज (मंगळवार) आर्थिक वर्षातील तिसरे पतधोरण जाहीर केले. यानुसार रेपो, रिव्हर्स रेपो आणि कॅश रिव्हर्स रेपोच्या (सीसीआर) दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्याजदर जैसे थेच राहाणार आहे. व्याजदर कपातीची आशा बाळगलेल्या देशातील तमाम सर्वसामान्य नागरिकांची निराशा झाली आहे.

आरबीआयने रेपो रेट 7.25 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 6.25 टक्के असा कायम ठेवला आहे. त्यात कोणताही बदल न झाल्यामुळे कर्जावरील मासिक हप्त्याच्या व्याजदरात कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, वर्षभरात तीन वेळा व्याजदरात कपात झाली आहे. याआधी दोन जूनला आरबीआयने रेपो रेटमध्ये पाव टक्क्यांची (0.25%) कपात केली होती.

पुढील स्लाइडवर वाचा, राजन यांचे अधिकार कमी करण्यावर सरकारची माघार