आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Retail Investors' Mutual Fund Asset Base Surges 51% To Rs 2.43 Lakh Crore

म्युच्युअल फंड याेजनांवर यंदा किरकोळ गुंतवणूकदारांच्या उड्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भांडवल बाजारातील तेजीचा लाभ घेताना किरकाेळ गुंतवणूकदारांचे म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचे प्रमाण वाढले अाहे. त्यामुळे मार्चअखेर संपलेल्या कालावधीत किरकाेळ गुंतवणूकदारांच्या म्युच्युअल फंडांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत ५१ टक्क्यांनी वाढ हाेऊन ती २.४३ काेटी रुपयांवर गेली अाहे.

विशेष म्हणजे १५ अव्वल शहरांमधून निधीचा अाेघ अाल्याने या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत वाढ झाली असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले. मागील अार्थिक वर्षात सेन्सेक्समध्ये २५ टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे म्युच्युअल फंडांच्या समभागांशी निगडित याेजनांमध्ये प्रामुख्याने जास्त रक्कम अाली अाहे.

रिलायन्स एमएफ अव्वल :
प्रमाण अाणि प्रत्यक्ष अशा दाेन्हींमध्ये रिलायन्स म्युच्युअल फंडाकडील किरकाेळ गुंतवणूकदारांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्तेत सर्वाधिक वाढ झाली अाहे. रिलायन्सच्या म्युच्युअल फंडातील िकरकाेळ गुंतवणूकदारांच्या व्यवस्थापनाखालील मालमत्ता ९५ टक्क्यांनी वाढून ती मार्चअखेर १३,२७० काेटी रुपयांवरून २७,३०७ काेटी रुपयांवर गेली अाहे.