आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फंडातील गुंतवणुकीत 36,000 कोटी रु. वाढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली | म्युच्युअल फंडाच्या योजनांमध्ये नोव्हेंबर महिन्यात ३६,००० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची गुंतवणूक झाली आहे. एप्रिल - नोव्हेंबरदरम्यान गुंतवणूकदारांनी ३ लाख कोटी रुपये या योजनांमध्ये टाकले. वर्षभरापूर्वीच्या तुलनेत हा आकडा ६५ टक्के जास्त आहे. सर्व फंडांमध्ये एयूएम रेकॉर्ड १६.५ लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे.

3.03 लाख कोटी रु. गुंतवणूक एप्रिल - नोव्हेंबर २०१६ मध्ये
1.84 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती गेल्या वर्षी या कालावधीत
३६,०२१ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली नोव्हेंबरमध्ये ३२,३३४ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती ऑक्टोबरमध्ये
६९कोटी रुपये गुंतवणूकदारांनी काढले गोल्ड ईटीएफमधून
९,०७९ कोटी रुपयांची गुंतवणूक इक्विटी/इक्विटी लिंक्ड फंडामध्ये
३,६३२कोटी रुपयांची गुंतवणूक बॅलन्स फंडामध्ये
नोटाबंदीचा परिणाम
नोटाबंदीमुळे फंडामध्ये जास्त गुंतवणूक झाली असल्याचे मत बजाज कॅपिटल समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल चोपडा यांनी व्यक्त केले. नोटाबंदीनंतर शेअर बाजारात घसरण झाली. कमी किमतीमधील फंड आकर्षण ठरले. डिसेंबर महिन्यातही असेच चित्र राहण्याची शक्यता आहे.
बातम्या आणखी आहेत...