आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rupee Notes In Your Wallet Are Carrying Disease Warns Study

चलनी नोटा हानिकारक, 10, 20, 100 रुपयांच्या नोटांवर आढळला VIRUS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- इंडियन करन्सी अर्थात भारतीय चलनी नोटांविषयी एका धक्कादायक माहिती समोर आली आहे. ती म्हणजे, 10, 20 आणि 100 रुपयांच्या नोटा आरोग्यास हानिकारक आहेत. या नोटांवर धोकादायक व्हायरस आढळून आले आहेत.

भारतीय शास्त्रज्ञांच्या एका पॅनलद्वारा करण्यात आलेल्या एका विशेष अभ्यासात या नोटांवर बॅक्टेरिया आणि व्हायरस आढळून आला आहे. बॅक्टेरिया आणि व्हायरस आरोग्यास हानिकारक असून त्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी होते, असेही शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

'काउंसिल ऑफ सायंटिफिक अॅण्‍ड इंडस्ट्रियल रिसर्चच्या सहकार्यातून इन्स्टिट्यूट ऑफ जिनोमिक्स आणि इंटीग्रेटिव्ह बायोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केले आहे. चलनी नोटांवर आढळलेली बुरशी आणि आदिजीवसंघाच्या संक्रमणातून जीवघेणे इन्फेक्शन होऊ शकते, असा इशाराही शास्त्रज्ञांनी दिला आहे.
10, 20 आणि 100 रुपयांच्या नोटांवर सापडले व्हायरस
या संशोधनासाठी 10, 20 आणि 100 रुपयांच्या नोटांचा वापर करण्यात आला. शास्त्रज्ञांनी संशोधनात "a shotgun metagenome sequencing approach" तंत्रज्ञानाचीही मदत घेतली. ही नवे तंत्रज्ञान जिवाणूविषयी जटील माहिती मिळवण्यासाठी प्रभावी ठरले आहे.
रोगप्रतिकारक क्षमता कमी करणारे जीन्स आढळले
शास्त्रज्ञांच्या मते, 10, 20 आणि 100 रुपयांच्या नोटांवर 78 जिवाणू आणि 18 जीन्स आढळले आहेत. सापडलेले जीन्स आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहेत. जीन्स रोगप्रतिकारक क्षमता कमी करतात. शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनाचा अहवाल 'Plos One'च्या जूनच्या अंकात प्रकाशित झाला आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, किती हानिकारक आहेत हे व्हायरस
(टिप: छायाचित्रे फक्त सादरीकरणासाठी वापरण्यात आले आहेत.)