आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HDFC चे बॅंकींग महागले; 1 एप्रिलपासून SBI ग्राहकांना देणार केवळ 3 फ्री ट्रान्झॅक्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- खासगी क्षेत्रातील अग्रेसर असलेल्या एचडीएफसी बँकेचे बँकींग आजपासून (बुधवार) महागले आहे. होम ब्रँचमध्ये महिन्याला फ्री कॅश ट्रान्सझॅक्शनची मर्यादा 4 करण्यात आली आहे. त्यानंतर होणार्‍या प्रत्येक कॅश ट्रान्सझॅक्शनवर 150 रुपये शुल्क आकरले जाणार आहे.

दुसरीकडे, देशातील सर्वात मोठी बँक अर्थात भारतीय स्टेट बँकेने (SBI) आपल्या ग्राहकांना महिन्यात केवळ 3 कॅश ट्रान्सझॅक्शन फ्री देण्याचा निर्णय घेणता आहे. येत्या 1 एप्रिलपासून नवा नियम लागू होणार आहे. नंतरच्या प्रत्येक ट्रान्सझॅक्शन 50 रुपये चार्ज आकारण्यात येणार आहे.

बँकांचा निर्णय नुकदानदायक... 
बॅंकांचा हा निर्णय ग्राहकांचे आर्थिक नुकसान करणारा आहे. कॅशलेस ट्रान्सझॅक्शनच्या नावाखाली बँका ग्राहकांच्या पैशाने आपापले खिशे गरम करत असल्याचा आरोप ग्राहक मंचने केला आहे. 

SBI आकारेल सेव्हिंग अकाउंटवर कॅश ट्रान्सझॅक्शन शुल्क...
कालमर्यादा फ्री ट्रान्सझॅक्शन शुल्क
एक महिना 3 कॅश ट्रान्सझॅक्शन 50 रुपये 

एचडीएफसी बँकेचा नवा नियम...
-एचडीएफसी बँकेने 1 मार्चपासून नवा नियम लागू केला आहे. 
- एचडीएफसीच्या अकाउंटवरून दुसर्‍या बँक अकाउंटवर केवळ 25000 रुपये पाठवता येतील. 
- महिन्याला केवळ चार ट्रान्सझॅक्शन फ्री असतील. नंतरच्या प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर  150 रुपये शुक्ल आकारण्यात येतील.

आयसीआयसीआय आकारणार 150 रुपये...
- आयसीआयसीआय बॅंकेने महिन्यात फ्री कॅश ट्रान्सझॅक्शनची मर्यादा चार केली आहे. त्यानंतरच्या प्रत्येक ट्रान्सझॅक्शनवर 150 रुपये आकारण्यात येणार आहे. 
बातम्या आणखी आहेत...