आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआयची महाविलीनीकरण प्रक्रिया ऑक्टोबरपासून सुरू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सहायक बँका तसेच भारतीय महिला बँकेची एसबीआयमध्ये विलीनीकरणाची प्रक्रिया ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. ही सर्व प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न बँकेच्या वतीने करण्यात येत आहे. या प्रक्रियेनंतर एसबीआय जगातील ४५ वी सर्वात मोठी बँक होणार आहे. एसबीआय प्रमुख अरुंधती भट्टाचार्य यांनी रविवारी एका मुलाखती दरम्यान ही माहिती दिली.

या संबंधात असलेल्या तक्रारींसाठी बनवण्यात आलेल्या समितीचा अहवाल या महिन्यातच तयार होण्याची अपेक्षा असल्याचे भट्टाचार्य यांनी सांगितले. त्यानंतर आमचा अहवाल रिझर्व्ह बँक तसेच सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवणार आहोत. यामध्ये सुमारे एक महिन्याचा कालावधी जाऊ शकतो. त्यानंतर ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाच सहायक बँका तसेच भारतीय महिला बँकेचे विलीनीकरण झाल्यानंतर एसबीआयमध्ये सरकारची भागीदारी कमी होऊन ५९.७० टक्के राहणार आहे. जून तिमाहीमध्ये सरकारची ६१.३० टक्के भागीदारी होती. सध्या एसबीआयच्या एकूण शाखांची संख्या १६,५०० आहे. यामध्ये ३६ देशांमधील १९१ विदेशी कार्यालयांचा देखील समावेश असल्याची माहितीही भट्टाचार्य यांनी दिली. या आधी २००८ मध्ये स्टेट बँक ऑफ सौराष्ट्रचेही एसबीआयमध्ये विलीनीकरण झाले होते. त्यानंतर दोन वर्षांनी स्टेट बँक ऑफ इंदौरचे विलीनीकरण झाले. चालू वर्षात ऑगस्टमध्ये एसबीआयच्या संचालक मंडळाने पाच सहायक बँका तसेच भारतीय महिला बँकेच्या (बीएमबी) अधिग्रहणाला तसेच विलीनीकरणासाठी स्वॅप रेशोला मंजुरी दिली होती. एसबीआयच्या तीन लिस्टेड सहायक बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर (एसबीबीजे), स्टेट बँक ऑफ मैसूर (एसबीएम), स्टेट बँक ऑफ त्रावणकोर (एसबीटी) यांचा समावेश आहे. स्टेट बँक ऑफ पटियाला आणि स्टेट बँक ऑफ हैदराबाद लिस्टेड बँका नाहीत. या दोन्ही बँकांवर आधी एसबीआयची मालकी होती.

>सहायक बँका तसेच भारतीय महिला बँकेची विलीनीकरणाची प्रक्रिया पुढील वर्षी मार्चपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा : अरुंधती भट्टाचार्य

विलीनीकरणात काय?
>एसबीबीजेच्या१० रुपयांच्या १० शेअरच्या बदल्यात एसबीआयचे एक रुपयांचे २८ शेअर मिळतील.
>एसबीएम, एसबीटीच्या शेअरधारकांना १० शेअरच्या बदल्यात एसबीआयचे २२ शेअर मिळेल
>बीएमबीच्या बाबत १० रुपये मूल्य असलेल्या प्रत्येक १०० कोटी शेअरसाठी एसबीआयचे ४,४२,३१,५१० शेअर दिले जातील.
>ज्या बँकांचे विलीनीकरण करण्यात येणार आहे, त्या बँकांच्या कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्ते कायम राहतील. तसेच निवृत्तीनंतरचे लाभदेखील कमी होणार नाही.

विलीनीकरणानंतरची स्थिती अशी
>३७लाख कोटी रुपयांचे अॅसेट्स
>४५ वी मोठी बँक बनेल जगातील
>२२,५०० शाखा
>५८,००० पेक्षा जास्त एटीएम
>५० कोटींपेक्षा जास्त ग्राहक असतील.
बातम्या आणखी आहेत...