आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एसबीआयचे कर्ज मार्चनंतरच स्वस्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयने मार्च २०१६ पर्यंत कर्जाच्या व्याजदरात कपात करण्यास नकार दिला आहे. पुढील अार्थिक वर्षातच व्याजदरात कपातीबाबत विचार केला जाणार असल्याचे बँकेच्या अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांनी सांगितले.

विशेष म्हणजे खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँकेने याच आठवड्यात ०.०५ टक्क्यांनी व्याजदरात कपात केली असून व्याजदर ९.३० टक्के केला आहे. एसबीआयने ऑक्टोबर महिन्यात बेस रेट ९.७० टक्क्यांवरून ०.४० टक्क्याने कमी करून ९.३० टक्के केला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वतीने २९ सप्टेंबरला रेपो रेटमध्ये अर्ध्या टक्क्याची कपात करण्यात आली होती. त्यानंतर एसबीआय बँकेच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला होता.

एप्रिलच्या मध्ये म्हणजेच ज्या वेळी बेस रेट ठरण्याची नवी पद्धत लागू होईल त्या वेळीच एसबीआय व्याजरात कपात करेल, असे मत अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.